ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – वेतनी कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी महासमादेशक मुख्यालय होमगार्ड वा ते धकाते यांनी शासनाचे कोणतेही आदेश नसताना मानसेवी समादेशक बृहन्मुंबई पदाचा बोगस गणवेश घातला आहे त्या अनुषंगाने जोपर्यंत त्यांच्यावर कार्यवाही होत नाही तोपर्यंत त्यांचे सेवा निवृत्ती वेतन रोखावे, अशी विनंती करणारे निवेदन होमगार्ड संघर्ष समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सिद्धार्थ डी जाधव यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व महासमादेशक होमगार्ड यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, उदय गणेश पाटील यांनी माहितीच्या अधिकाराखाली वा ते धकाते – वेतनी कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी मुख्यालय होमगार्ड महाराष्ट्र राज्य यांनी पदाचा गैरवापर करून दिनांक 30 12 2015 धकाते यांच्याकडे समादेशक होमगार्ड बृहन्मुंबई पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता आणि धकाते भरती झाल्यापासून मानसेवी होमगार्ड अधिकाऱ्यांचे सारखे दिसणारे बोगस गणवेश घालत होते तसेच प्रजासत्ताक दिन 2016 या कार्यक्रमांमध्ये त्यांनी खाकी गणवेश ,क्रॉस बेल्ट, लाल बूट ,गणवेश वरती कबुतर व मेपल लिव्ह, अधिकारी पी कॅप घातल्याचे स्वतः धकाते यांनी माहितीच्या अधिकाराखाली दिले आहे परंतु आपणास गणवेश घालण्याबाबतचे शासनाच्या आदेशाचे परिपत्रक किंवा संबंधित महासमादेशक यांच्या आदेशाची प्रत कागदपत्र विचारणा करण्यात आले परंतु असे कोणतेही कागदपत्र अभिलेखावर नसल्याचे त्यांनी लेखी दिले आहे तसेच धकाते मानसेवी होमगार्ड म्हणून सन 1986 रोजी भरती झाल्याचे खोटी माहिती दिली आहे. धकाते यांनी होमगार्डचे प्रशिक्षण व शस्त्र प्रशिक्षण घेतल्याचे कोणतेही पुरावे माहितीच्या अधिकाराखाली दिले नाहीत व स्वतः लेखी दिले आहे की याचे कोणते कागदपत्र अभिलेखावर नाही .
एक विशेष नोंद घेण्यात यावी की होमगार्ड भरती होण्यासाठी 165 सेंटिमीटर उंचीची आवश्यकता असते त्यात धकाते यांची उंची 4 फूट आहे असे असून सुद्धा धकाते एवढ्या मोठ्या पदावर खोटी माहिती माहितीच्याअधिकारात देत आहे अशा व्यक्ती वरती 420 गुन्हा व फौजदारी गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. धकाते यांना गणवेश परिधान करण्याचे कोणतेही अधिकार नसताना त्यांनी आजपर्यंत गणवेश हडप केलेले आहे त्याचीसुद्धा वसुली करण्यात यावी कारण धकाते दोन महिन्यानंतर सेवानिवृत्त होत आहेत. ते सेवानिवृत्त होण्याअगोदर त्यांची चौकशी करून त्याची वसुली करण्यात यावी अन्यथा त्यांना सेवानिवृत्ती वेतन देऊ नये तसेच दुसऱ्या मानसेवी होमगार्ड यांना कायदा शिकवणाऱ्या धकाते यांनासुद्धा कायदा काय असतो ते दाखवणे गरजेचे आहे कारण धकाते यांच्यामुळे अनेक होमगार्डचे संसार उद्ध्वस्त झालेले आहे अनेक निर्णय आदेश देऊन होमगार्ड यांना रस्त्यावर आणले आहे
सदर बाब महासमादेशक होमगार्ड संजय पांडे यांना माहिती असूनसुद्धा त्यांनीसुद्धा आजपर्यंत कोणतीच कार्यवाही केली नाही. धकाते हे ज्या पदावर ती लायक नसतानासुद्धा त्यांची प्रत्येक पदावर ती नियुक्ती केली आहे ही खूप गंभीर बाब आहे तसेच गृह विभागाने अनेक वेळा चौकशी अहवाल पाठविण्याचे महासमादेशक यांना आदेश देऊनसुद्धा आजपर्यंत महासमादेशक यांनी कार्यवाहीचे अहवाल पाठवले नाही हीसुद्धा खूप गंभीर बाब आहे कारण महासमादेशकपेक्षा शासन गृहविभाग मोठे आहे तरीसुद्धा त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केली जात नाही मनमानी कारभार केला जात आहे महासमादेशक यांच्यामार्फत कार्यालयामध्ये 300 कोटीचा घोटाळा झाला आहे त्या घोटाळा संबंधित ची तक्रार अर्ज धकाते यांच्याकडे असूनसुद्धा त्यांनी खोटी माहिती दिली की सदर तक्रार अर्ज सीजी संजय पांडे यांनी स्वतःकडे ठेवून घेतला आहे, अशी दिशाभूल करणारी खोटी माहिती दिली आहे. सदर बाब गृह विभागाचे कक्ष अधिकारी दीपक सावंत यांनी धकाते यांना फोनवरती सांगूनसुद्धा तक्रार अर्जाची माहिती सिद्धार्थ जाधव यांना द्या तरीसुद्धा त्यांनी 300 कोटीचा तक्रार अर्ज लपवून ठेवलेला आहे की जेणेकरून अधिकार्यांवर ती कार्यवाही होऊ नये म्हणून तरी अशा बेजबाबदार धकाते अधिकाऱ्यांवर प्रथम कार्यवाही होणे आवश्यक आहे
त्यात अजून एक विशेष की संजय पांडे यांचे पीए विजय भा पवार प्रमुख लिपिक हे महासमादेशक होमगार्ड कार्यालय मध्ये गेले 24 वर्ष आज र्यंत कार्यरत आहेत तरीसुद्धा त्यांची बदली झालेली नाही तसेच शासनाने त्यांच्याविरोधात अतिशय गंभीर नोंदणी केलेले आहे तरीसुद्धा संजय पांडे हे विजय भा पवार यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न का करत आहेत हेच कळण्याचा मार्ग नाही. तक्रारदार होमगार्ड संघर्ष समिती प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सिद्धार्थ जाधव यांनी प्रत्यक्ष संजय पांडे यांची भेट घेऊन सदर बाब निदर्शनास आणून दिली तरीही आजपर्यंत कार्यवाही झाली नाही. तरी याबाबत कार्यवाही करण्यात यावी, धकाते व विजय भा पवार प्रमुख लिपिक सीजी यांचे पीए यांच्यावरही कार्यवाही करून धकाते यांचे सेवानिवृत्ती वेतन रोखण्यात यावे .







