जे. जे. रुग्णालयात महिला डॉक्टरचा वॉर्डबॉयकडून विनयभंग

मुंबई – मुंबईतील प्रसिद्ध जे. जे. रुग्णालयात धक्कादायक प्रकार घडला आहे. एका शिकाऊ महिला डॉक्टरची वॉर्डबॉयने छेड काढली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी वॉर्डबॉयला अटक केली आहे.
जे. जे. रुग्णालयात पीडिता शिकाऊ डॉक्टर म्हणून काम करते. रुग्णालयातील एका वॉर्डबॉयनं तिची छेड काढली आहे. हा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री घडला. ही महिला डॉक्टर रुग्णाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी विभागात जात होती. त्याचवेळी ड्युटीवर असलेल्या वॉर्डबॉयनं तिचा विनयभंग केला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे ती प्रचंड घाबरली. तिने आरडाओरडा केला. त्यानंतर आरोपी वॉर्डबॉय तेथून पसार झाला.
या प्रकरणी महिला डॉक्टरनं पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपी वॉर्डबॉयविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास करण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here