खाजगी फायनान्स व इतर पतसंस्था, बँकांनी जबरदस्तीने वसुली केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडले जाईल – जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ

धरणगाव (योगेश पाटील) –संपूर्ण जगा मध्ये मार्च महिन्यापासून कोरोना या विषाणूने थैमान घातलेले असून लाखो हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत संपूर्ण उद्योग धंदे बंद पडलेले आहेत मजुऱ्या बंद पडलेल्या आहेत.महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाने जनतेला सर्वांपरी मदत करीत आहेत अनेक व्यक्ती परप्रतात गावात अडकलेले आहेत घरातील कर्ता पुरुष घरी असल्याने कुटुंबाचे उदरनिर्वाह होणेसुद्धा अशक्य झाले आहे. अश्यात केंद्र व राज्याने जनतेवरील वसुली सक्तीने न करता प्रेमाने करावी बळजबरी करू नये असे आदेश असल्यावर सुद्धा बँक वाले,पतसंस्था वाले,तहसील कार्यालये,तलाठी, सर्कल खाजगी बजाज फायनान्स, बचत गट वाले हे जनतेच्या घरी जाऊन दादागिरी करून वसुली करीत आहेत कर्मचाऱ्यांवर दबाव आणून,दडपण आणून कार्यकरित आहेत.ह्या गोष्टी कुठेतरी थांबाव्यात संबंधितांवर कार्यवाही व्हावी संबधीत अधिकारी कर्मचाऱ्यांना मुदतीच्या आत वसुली न आल्यास तुम्हास सेवेतून कमी केले जाईल आश्या धमक्या देत आहे.
हा सर्व प्रकार हा कुठेतरी थांबवावा अन्यथा होणाऱ्या परिणामास खाजगी फायनान्स वह इतर जवाबदार राहतील व शिवसेना आपल्या स्टाईलने आंदोलन छेडेल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी दिला आहे . यासंदर्भात तहसीलदार श्री.नितीन देवरे,नायब तहसीलदार डी.एम.वाडीलकर यांना निवेदन देण्यात आले आहे.
या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ,उपजिल्हा प्रमुख पी.एम.पाटील.सर,नगराध्यक्ष निलेश चौधरी, उपनगराध्यक्ष विलास महाजन,गटनेते पप्पू भावे,नगरसेवक अहमद पठाण,जितेंद्र धनगर, नंदू पाटील,अजय चव्हाण,विलास पवार, रवींद्र कंखरे, सुरेश महाजन,राहुल रोकडे,आदी पदाधिकारी उपस्थित होते. या निवेदनाच्या प्रती पालक मंत्री ना.गुलाबरावजी पाटिल, जिल्हाधिकारी जळगांव, खासदार जळगांव लोकसभा, पोलीस निरीक्षक धरणगांव यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here