बोदवड (प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी) – तालुक्यातील जामठी येथील मूळचे मध्य प्रदेशातील रहिवासी असलेल्या पंरतु येथे मजूरी करुन उदरनिर्वाह करत असुन अदिवासी कुटुंबाचे महिलेला अवघ्या पाच मिनिटात रेशन कार्ड मिळाले. तहसिलदार हेमंत पाटील यांनी लक्ष घातल्याने अत्यंत महत्वपूर्ण तत्परतेने या महिलेला हे रेशन कार्ड देऊन तिला धान्य पुरवठा वाटपाचे सुचना दिल्या. त्यामुळे या अदिवासी महिलेस स्वाभाविक आनंद झाला.
मिराबाई सुभाष पावरी या पावरा समाजाच्या महिलेचे कुटुंब अनेक वर्षांपूर्वी पासुन स्थायिक असुन कापूस जिनिंग कंपनित मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करतात मात्र गेल्या काही वर्षांपूर्वी येथील पंजाब जिनिंग बंद पडल्याने याच्या हातचे काम सुटल्याने गुरे चारण्यासह बांधकाम करणे आदी कामे करून याचा उदरनिर्वाह सुरू आहे या महिलेच्या कुटुंबात दोन मुले चार मुली आहेत असा मोठा परिवार आहे
शहरातील प्रा. विनोद चौधरी यांनी या कुटुंबास तहसिलदार यांच्या कडे नेउन त्याना कुटुंबासह लॉकडाऊनच्या काळात त्यांच्यावर ओढलेल्या उपासमारीची बद्दल संपूर्ण माहीती दिली त्यामुळे तहसिलदार हेमंत पाटील यांनी तत्परता दाखविली अवघ्या पाच मिनिटात नवीन रेशन कार्ड उपलब्ध करुन दिले.







