येवती परिसरातील शिवार फेरीत अंतर्गत शेतपिकांसह फाळवर्गीय पिकांची पाहणी

bodwad

बोदवड (प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी) – बोदवड तालुक्यातील येवती परिसरात शुक्रवारी शेती शिवार पिक पाहणी करण्यात आली. महा राजस्व अभियान अंतर्गत तालुक्यातील हा शेती शिवार उपक्रम राबविण्यात आला त्या अंतर्गत शेतकर्‍यांनी शिव रस्त्याची पाहणी केली पाहणीत फळवर्गीय पिकांचा समावेश असल्याने परिसरातील ज्यानी लिंबू डाळिंब सिताफळ किवा ईतर फळ वर्गीय पिके घेतली असतील अशा शेतकऱ्यांच्या बांधावर जावुन पिक पाहणी करण्यात आली.

 

 


नासिक विभागीय आयुक्तांच्या परिपत्रकानुसार व तहसीलदार हेमंत पाटील यांच्या आदेशावरून हा कार्यक्रम राबविण्यात आला. शेतकर्‍यां साठी येवती गावाचा शिवारात आयोजित करण्यात आली तसेच रहीम. शे. रजाक यांच्या शेतात डाळिंब पिकाची पाहणी केली 500 झाडांची लागवडीची पाहणी केली एका शेतात विहीरीची पाहणी केली अन्य एका शेतात जाभुळ आवळा व पेरू या फळबागांची पाहणी केली यात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभाग घेतला.

 

 


येवती परिसरातील यंदा पाऊस कमी झाल्याने पिके कोमजत आहे त्यांत पिक पाहणी कार्यक्रम घेऊन शेतकर्‍यांना काही दिलाशा मिळाला. शेती शिवार पिंक पाहणी करताना तलाठी सुक्षमा गरडे. कोतवाल तुषार सवारी, सरपंच संजय पाटील ग्रामसेवक गणेश चोले कृषि साहाय्यक नितीन महाजन बोदवड चे मंडळ अधिकारी श्रिनाथ भाऊसाहेब माजी कोतवाल बिस्मिल्ला खां पठान पाणी पुरवठा कर्मचारी पंडित वाघ ग्रामपंचायत लिपिक योगेश वानखेड़े शेतकरी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here