खडसेंच्या पक्षांतरांचे मुहूर्त रोज बदलत असतात – देवेंद्र फडणवीस

devendra-fadanvis

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्यांच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असतानाच खडसेंचा पक्षांतराचा मुहूर्तही निश्चित झाला असल्याचं बोललं जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही आता या संभाव्य पक्षांतराबाबत भाष्य केलं आहे.

 

 

 

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सध्या उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ते शेतकऱ्यांच्या बांधावर फिरुन त्यांना धीर देत आहेत. याच दरम्यान, फडणवीस यांना खडसेंच्या पक्षांतराबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असताना त्यांनी केवळ दोन वाक्यांत प्रतिक्रिया दिली आहे. ‘खडसेंच्या पक्षांतरांचा मुहूर्त रोज बदलत असतात, या विषयावर मी काही बोलणं योग्य नाही,’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 

 

 

एकनाथराव खडसे २२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतंय. नाथाभाऊ मोजकेच कार्यकर्ते व कन्या अॅड रोहिणी खडसे- खेवलकर यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यासाठी ते उद्याच दुपारी मुंबईकडे निघणार आहेत.त्यादृष्टीने त्यांची पूर्ण तयारी झाली आहे. मात्र एकनाथराव खडसे यांच्या सून खासदार रक्षाताई खडसे या भाजपच्या खासदार आहेत. त्या भाजपमध्येच राहणार आहेत, असंही कळतंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here