रावेर (तालुका प्रतिनिधी हमीद तडवी) – तालुक्यात 15 ऑक्टोबर 2020 रोजीच्या राञी घडलेल्या अमानुष,निर्दयी हत्यांकांड घटनेचे वृत्त संपुर्ण भारतभर पसरले असल्याने रावेर तालुक्यातील बोरखेडा शेतशिवार चार भावंडाची हत्या झाली असल्याने यात मुलींवर बलात्कार करुन अतिशय निर्दयी अशी हत्या झाली आहे,अंगाला थरकाप उडवणारी घटना घडल्याने चार भावंडाची हत्या झाली आहे, त्याचा आम्ही निषेध करीत असून, या पिडीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी देशव्यापी आंदोलनदेखील करु, असा इशारा बहुजन क्रांती मोर्चाकडून देण्यात आला आहे.
यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संघटना पिडीत कुटूंबाला न्याय मिळवुन देण्यासाठी घटनेचा निषेध करीत आहेत,त्यातच आज दिनांक 20 ऑक्टोबर 2020 रोजी बहुजन क्रांती मोर्चा (बामसेफ)चे रावेर तालुका संयोजक साहेबराव वानखेडे व जिल्हा प्रचारक नितीन गाढे यांच्या सोबत,असंख्य सामाजिक कार्यकर्ते रुपेश अटकाटे उर्फ बंटीभाऊ,शेख नजीर,पवन डोळे आणि राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका संयोजक यांनी शेख इरफान शेख कुतबुद्दीन या सर्वांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन पिडीत कुटूंबियांची भेट घेऊन सात्वन केले,व त्या पिडीत कुटूंबाला न्याय मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत.
हत्याकांड झालेल्या पिडीत कुटुंबाला न्याय मिळवुन देण्यासाठी देशव्यापी आंदोलन करणार असल्याचे बामसेफ बहुजन क्रांती मोर्चा च्या पदाधिकाऱ्यांकडून संबधित शासन,प्रशासन विभागाला इशारा देण्यात आला आहे आणि या हत्याकांड बाबतीत रावेर पोलिस स्टेशन च्या पोलिस निरिक्षक रामदास वाकोडे व रावेर तहसिलदार कार्यालयाकडे देखील निवेदन देण्यात आले आहे,तसेच या रावेर बोरखेडा हत्याकांडाची कसुन चौकशी करुन आरोप्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी. असेही बहुजन क्रांती मोर्चा (बामसेफ)रावेर पदाधिकाऱ्यांकडुन हत्याकांड घटनेचा निषेध,निषेध,निषेध करण्यात आला आहे.







