ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – घाटकोपरवरून माहुल गावच्या दिशेने जाणाऱ्या बेस्टच्या ३८१ क्रमांकच्या बसचा मंगळवारी ( दि. २०) विचित्र अपघात झाला. चेंबूर पोलिस स्टेशनसमोर बसंत पार्क येथे हा अपघात झाला आहे.
या बसच्या चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने बसवरील ताबा सुटला व बस फुटपाथवरील भाजीच्या दुकानात घुसली व सिग्नलला धडकून थांबली.
बसच्या चालकाला घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले. बस चालकाची प्रकृती आता स्थिर आहे. सुदैवाने बसमध्ये असलेले दहा ते बारा प्रवासी सुखरूप आहेत. घटनास्थळी चेंबूर आणि वाहतूक पोलिस दाखल झाले असून पुढील कारवाई करीत आहेत.







