आता चंद्रावरही मिळणार 4G इंटरनेट

4g-at-moon

वॉशिंग्टन – चंद्रावर पहिले सेल्युलर नेटवर्क बनविण्यासाठी ‘नासा’ने नोकिया कंपनीची निवड केली आहे. येत्या 2024 पर्यंत चंद्रावर मानवी सहली नेणे, तेथे दीर्घकाळ सुट्ट्या घालविणे हे ‘नासा’चे लक्ष्य आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरील अंतराळात 2022 च्या शेवटपर्यंत पहिली वायरलेस ब्रॉडबँड कम्युनिकेशन सिस्टीम साकार झालेली असेल, असा दावा कंपनीने केला आहे.

 



कंपनीने त्यासाठी टेक्सासच्या एका खासगी स्पेस क्राफ्ट डिझाईन कंपनीशी करारही केला आहे. ही कंपनी नोकियाची अवजारे, साहित्य चंद्रावर पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडणार आहे.

 



सुरुवातीला 4-जी/एलटीई सिस्टीम बसविली जाईल; पण उद्दिष्ट 5-जीचे असणार आहे. अंतराळ प्रवाशांना व्हॉईस व व्हिडीओद्वारे संवाद साधण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. टेलिमेट्री आणि बायोमेट्रिक डेटा एक्स्चेंज आणि रोव्हर्ससह अन्य रोबोटिक डिव्हाईसेसच्या रुजुवातीला, रिमोटली कंट्रोललाही परवानगी दिली जाईल.

 



चंद्रावरील सर्व प्रकारच्या विषम परिस्थितींचा सामना करण्यात हे नेटवर्क सक्षम असेल. नोकियाने सांगितले की, आम्ही 5-जीऐवजी 4-जी नेटवर्कचा उपयोग करू. या नेटवर्कचा वापर गेल्या काही दशकांपासून होत आहे आणि या नेटवर्कने आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. अर्थात, आगामी काळात चंद्रावरही 5-जी नेटवर्क सुरू करण्याचा मानस आहे. ‘नासा’ने नोकियाला या कामासाठी 103 कोटी रुपये अदा केले आहेत.

 


अर्थात, नोकियाने यापूर्वीही 2018 मध्ये एक जर्मन अंतराळ कंपनी आणि ‘व्होडाफोन यूके’सह संयुक्त विद्यमाने अपोलो 17 लँडिंग साईटवर सेल्युलर नेटवर्क बसविण्याची योजना आखली होती; पण ती पूर्ण होऊ शकली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here