डीजी लोण घर बांधणी अग्रीम तात्काळ मंजूर करण्याची पोलीस बॉईज असोसिएशनची मागणी

मुंबई (सिध्दार्थ जाधव) – महाराष्ट्र राज्यात अहोरात्र जनसेवेसाठीं पोलीस कर्तव्य पार पाडत असतात मात्र त्याच पोलीस राहण्यास स्वतः चे घर नाही यांसाठी त्यानां अग्रीम मंजूर करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा याकरिता मागील सरकारने काही बँक सोबत करार करून DG लोण घर बांधणी अग्रीम मंजूर करून हजारो कर्मचाऱ्यांना वाटप केलेले आहे. नवीन नियमाप्रमाणे अगोदर प्लॉट किंवा घर विकत घेऊन त्यावर बँकेचे कर्ज घेतल्यानंतर शासनाचे अग्रीम मंजूर करण्यात येते , यापूर्वी पोलीसांनी आपला प्लॉट किंवा घर शासनास मोडगेज गहाणखत करून घ्यावे लागतात या सर्व प्रोसिजर पूर्ण करून देखील मागील 1 वर्षापासून कर्मचाऱ्यांना DG लोण देण्यात आले नाही , प्लॉट व घर लोन काढून खरेदी केल्यामुळे पोलीस सध्या त्याचे EMI 1 वर्षांपासून भरत आहे त्याचा आर्थिक ताण पडतो आहे, पोलिसांनी कर्जासाठीची पूर्ण कागतपत्रे व प्रोसिजर पूर्ण केले असून सदरची फाईल मंत्रालयात बँकेसोबतच्या फक्त करार साठी बाकी आहे व याचा आर्थिक फटका पोलिसांना बसत आहे सध्या आर्थिक परिस्थितीतुन बाहेर पडण्यासाठी बँका घर लोन घ्या म्हणून दररोज पेपरला बातम्या देत असताना मात्र पोलिसांची फाईल पेंडीग पडून आहे, तरी मे मुख्यमंत्री यांनी बँक सोबत व्यवहार करार करून तात्काळ पोलिसांच्या हक्काचे अग्रीम लोन DG लोण मंजूर करावे अन्यथा आम्ही लोकशाही मार्गाने राज्य भर आंदोलन करू, असे निवेदन पोलीस बॉईज असोसिएशनतर्फे रवि नानाभाऊ वैद्य यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here