माजी मंत्री,माजी खासदार हुसेन दलवाई यांच्याकडून नियुक्ती
मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राष्ट्रीय नेते, माजी मंत्री, माजी खासदार हुसेन दलवाई यांच्या नेतृत्वाखालील मौलाना आझाद विचार मंचच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आटपाडीचे सादिक खाटीक यांची नियुक्ती केल्याचे पत्र श्री. हुसेन दलवाई यांनी खाटीक यांना पाठविले आहे . या नियुक्ती बद्दल खाटीक यांचे सर्वत्र अभिनंदन व स्वागत होत आहे .
सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील माणदेशी आटपाडी तालुक्यातल्या सादिक खाटीक यांनी गेल्या ३६ वर्षात विविध क्षेत्रात मोठे काम केले आहे . राज्यातल्या विविध दैनिकातून ३२ वर्षे लक्षवेधी पत्रकारीता केलेल्या सादिक खाटीक यांचे वृतपत्र विश्वात मोठे काम आणि नाव आहे . मुस्लीम खाटीक समाजाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या सादिक खाटीक यांनी शासन नियुक्त ग.दि.माडगूळकर स्मारक समितीचे अशासकीय सदस्य म्हणून तसेच छत्रपती शिवाजी महाराज मुस्लीम ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष, व्यंकटेशतात्या माडगूळकर कथाकथन महोत्सव समितीचे अध्यक्ष म्हणून केले आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य म्हणून कार्यरत असणारे सादिक खाटीक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे जलसंपदा मंत्री ना . श्री .जयंतराव पाटील यांचे निष्ठावान अनुयायी म्हणून गत ३४ वर्षापासून राज्यभर ओळखले जातात . सर्वच क्षेत्रातल्या शेकडो प्रश्नांची उत्तम जाण असणाऱ्या सादिक खाटीक यांनी आपल्या चतुरस्त्र कार्याचा आलेख सदैव उंचावत ठेवला आहे .
राज्यातल्या सर्व जिल्ह्यात सुमारे दहा हजाराहून जास्त अभ्यासू ,सक्रीय आणि विविध पक्षीय कार्यकर्त्यांची नाळ जोडले गेलेल्या मौलाना आझाद विचार मंचच्या उपाध्यक्षपदी झालेल्या सादिक खाटीक यांच्या नियुक्तीने हजारो सर्वसामान्य मुस्लीम बांधवांना मोठा आनद होणार आहे. राज्यात मुस्लीम खाटीक समाजाची लोकसंख्या लाखोच्या घरात असून कोटीच्या संख्येतल्या राज्यातल्या मागास मुस्लीमांना सादिक खाटीक यांच्या रुपाने सर्व प्रिय , खंदा साथी, दोस्त मिळणार आहे.
थोर स्वातंत्र सेनानी, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री , भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने गत १९ वर्षापासून कार्यरत असणाऱ्या या आझाद विचार मंचने भारतीय मुस्लीम आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या मुस्लीमांच्या सर्वमान्य ,सर्वस्पर्शी, सर्वोतम आणि सर्व क्षेत्रातल्या प्रगतीसाठी मोठे काम केले आहे .
मुस्लीमांच्या शैक्षणीक, सामाजीक, सांस्कृतीक,आर्थिक, व्यापार, उद्योग, धार्मिक इत्यादी क्षेत्रातल्या प्रगतीसाठी गाव पातळी पासून देशपातळी पर्यत मोठा आवाज उठविण्याचा प्रयत्न मंचने केला आहे. मुस्लीम आरक्षणा साठी विविध आंदोलने, सभा, संमेलन ,परिसंवाद , चर्चासत्र, बैठकां बरोबरच विधीमंडळ ते संसदे पर्यंत या मंचने लक्षवेधी प्रयत्न केले आहेत .
सादिक खाटीक यांच्या नियुक्तीसाठी आझाद मंच चे प्रदेश सरचिटणीस हसीब नदाफ (सोलापूर ) यांनी विशेष प्रयत्न केले . मुंबई मंत्रालय येथे अल्पसंख्याक विभागात जॉईंट सेक्रेटरी पदावरून सेवानिवृत्त झालेल्या मुळच्या कासेगाव च्या (वाळवा) मुंबई स्थित श्रीमती ऐनुल अत्तार यांच्या सह आणखी तिघे उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत . नूतन प्रदेश उपाध्यक्ष सादिक खाटीक संपूर्ण महाराष्ट्रासाठी कार्यरत राहणार असल्याचे हसीब नदाफ यांनी सांगीतले.







