माझे कुटुंब माझी जबाबदारी कार्यक्रमांतर्गत हनुमाननगर, शिरुर भागात नागरिकांची आरोग्य तपासणी

pune-arogya-tapasani

पुणे (प्रतिनिधी सुनिल ज्ञानदेव भोसले) – कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने माझे कुटुंब माझी जबादारी योजना सुरू केली आहे.

 

 

शिरूर शहरात १४ तारखेपासुन २४ तारखेपर्यत, कार्यसम्राट आमदार.मा.श्री.अशोक बापु पवार,सभागृह नेते मा.श्री. प्रकाश शेठ धारीवाल ,नगराध्यक्ष.सौ. वैशाली दादाभाऊ वाखारे यांच्या मार्गदर्शना खाली आरोग्य तपासणी करण्यात सुरू आहे,अशी माहिती मुख्याधिकारी श्री.रोकडे शिरूर नगरपालिका घोडनदी यांनी दिली.

 

 

आज शिरूर मधील हनुमाननगर भागात सौ.वंदना ओहोळ, सौ.मंगल भोलेकर, विद्याधाम प्रशाला शिरूर, तपासणी करत आहे. यावेळी प्रशांत पवार राष्ट्रवादी सोशल मीडिया म्हणाले, सर्व नागरीकांनी आपली आरोग्य तपासणी करून द्यावी, आपल्याला काही त्रास होत असेल तर लगेच तपासणी करुन घ्यावी,प्रशासनाला सहकार्य करावे, यावेळी हनुमाननगर मित्र मंडळ व ट्रस्ट कार्यध्यक्ष. स्वनिल भाऊसाहेब हारदे उपस्थित होते.pune-medical-checkup

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here