नितीन बरडे यांची माघार; महापालिकेच्या स्थायी सभापतीपदी राजेंद्र घुगे पाटील बिनविरोध

jalgaon-rajendra-ghuge

जळगाव (प्रतिनिधी निलेश पाटील) – महानगरपालिकेच्या बहुचर्चित स्थायी समिती सभापतीपदी राजेंद्र घुगे पाटील हे निवडून आले आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे नितीन बरडे यांनी अर्ज दाखल केला होता. त्यांनी माघार घेतल्यामुळे सभागृहात त्यांची बिनविरोध निवड झाली. पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निवडीची घोषणा केली.

 

 

महानगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीसाठी सभा घेण्यात आली आणि सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत तसेच आयुक्त सतीश कुलकर्णी नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. स्थायी समितीचे सदस्य ऑनलाईन उपस्थित होते.

 

 

नितीन बरडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमची सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवसेनेचे वरिष्ठ नितीन लढ्ढा,विरोधी पक्षनेते सुनील महाजन, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजुमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपस्थित होते. जळगाव शहराच्या विकासासाठी माघार घ्यावी अशी विनंती केल्यामुळे मी या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत माघार घेतली आहे असेही बरडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here