अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) – ओम साई सांस्कृतिक मंडळ श्रीबाग नंबर 2 यांच्यातर्फे रविवार दि 18 रोजी सकाळी 11 वाजता कोविड या आजारावर ओम साई सांस्कृतिक मंडळाने सोशल डिस्टनसिंग चे नियम पाळून आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते
https://www.facebook.com/BulandPoliceTimes/videos/406410680761928/?t=3
माझे कुटुंब माझी जबाबदारी या अभियानाअंतर्गत डॉ सौरभ पाटील डॉ अपूर्वा पाटील डॉ प्रियांका म्हात्रे यांनी नागरिकांची तपासणी केली तसेच मास्क हॅन्डग्लोज वाटप करण्यात आले. मास्क अॅडव्होकेट निला तुळपुळे यांच्या सौजन्याने व हॅण्डग्लोज राजेश व निता म्हात्रे डॉ.सौरभ पाटील यांच्या सौजन्याने देण्यात आले त्याचे वाटप ॲड. नीलाताई तुळपुळे आणि अनघा म्हात्रे यांच्याहस्ते करण्यात आले. 
यावेळी ब्लडप्रेशर, ब्लडशुगर,.टेम्प्रेचर,.ऑक्सिमिटरने ऑक्सिजन अशा टेस्ट करण्यात आल्या. परिसरातील सुमारे दीडशे नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला मंडळाचे अध्यक्ष जी एच पाटील. याच्या हस्ते सगळ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले
याप्रसंगी ॲड उमेश म्हात्रे, अनघा म्हात्रे, ॲड अमेय म्हात्रे, गिरीश तुळपुळे. ॲड पल्लवी तुळपुळे, पत्रकार राजेश बाष्टे उपस्थित होते. कार्यक्रमास विशेष सहकार्य मंगेश म्हात्रे, अक्षय गायकवाड. केदार पाटकर. राहुल तेली. विनीत खोत. मंगेश म्हात्रे . सुरज तेली यांचे लाभले .







