ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – ठाणे जिल्ह्याचे लाडके कमांडिंग ऑफिसर ठाणे, नवी मुंबई किरण गावंड, नेहमी गोरगरिबांसाठी धावून येणारे ठाणे जिल्ह्याचे अधिकारी श्री.गावंड हे नेहमी गरजूंना कधीही रात्री-बेरात्री मदत करत असतात सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचा हात नेहमी पुढे असतो सदर अधिकारी ,कर्मचारी असो त्यांच्या मदतीला धावून नेहमी जातात आणि त्यांची अडचणी समजून घेऊन त्यांना मदत करत असतात.
सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची प्रबळ शक्ती असल्यामुळे श्री गावंडे यांनी दादाची गावंड फाउंडेशन स्थापना केली. गेली 8 वर्ष गावड फाऊंडेशन हे सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आपल्या फाउंडेशन मार्फत सज्जनगड परिसरातील दुर्गम अशा 8 गावामध्ये मोफत ॲम्बुलन्स सेवा देत आहेत परंतु गेल्या कोरोना महामारी मुळे गेले आठ महिन्यांपासून खाजगी ॲम्बुलन्स बंद आहे त्यांची अडचण जाणून फाउंडेशनमार्फत कोरोना महामारी मध्ये 8 महिन्यापासून मोफत 24 तास ॲम्बुलन्स सेवा देत आहे.
श्री गावड यांच्या कार्यकालामध्ये अनेक गृहरक्षक दलातील अधिकारी त्यांनी घडवलेले आहेत श्री गावंड अनेक पुरस्काराने सन्मानित आहेत तसेच त्यांना शिवकालीन व जुन्या काळातील नाणी ,भांडी जमा करण्याचा छंद आहे त्यांनी आवडी खातर त्यांनी संग्रहालय स्थापन केलेले आहे यांच्या सामाजिक क्षेत्राची दखल म्हणुन पोलीस बॉईज असोशियन संस्थापक रवी ना वैद्य यांच्या आदेशानुसार प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सिद्धार्थ डी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश बनसोडे ठाणे जिल्हा अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार किरण राम गावंड यांना विशेष बाब म्हणून कोरोना योद्धा गौरव 2020 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले







