विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची सांगलीतील अतिवृष्टी भागांना भेटी

pravin-darekar

उध्वस्त शेती, खचलेले रस्ते याची केली पाहणी

सांगली (जिल्हा प्रतिनिधी शरद मोरे) – विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर गेले तीन दिवस राज्यात अतिवृष्टीच्या दौ-यावर आहेत. आज दरेकर यांनी सांगली जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांना भेट दिली. सांगली जिल्ह्यातील आटपाटी तालुक्यातील दिघांची या गावातील अतिवृष्टी बाधित पीकांची आज दरेकर यांनी पाहणी केली. पुराच्या पाण्यात गावातील संपूर्ण शेती वाहून गेलेली आहे. डांळिब, कांद्याचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे. तसेच रस्ता खचला असून पुलाची दुरावस्था झाली आहे. विटलापुर गावातील माणगंगा नदीवरील खवसपूर पाठबंधार्‍यामुळे शेतीचे पूर्णत: नुकसान झाले आहे. यावेळी नुकसानग्रस्त शेतीची दरेकर यांनी पाहणी केली.pravin-darekar-at-sangali-2

 

 

 

विटलापुर गावातील माणगंगा नदीवरील खवसपूर बंधार्‍यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. सांगलीतील आटपाटी तालुक्यातील अनुशिमला या गावाची पाहणी केली. यावेळी गावातील पाटबंधारे अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेलेले निदर्शनास आले. रस्ते खचल्यामुळे, पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना एका गावातून दुसऱ्या गावी जाणे मुश्किल झाले आहे. यावेळी श्रीमंत बाबासाहेब देशमुख सूतगिरणी सहकारी कारखान्याला ही भेट दिली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले. तसेच आटपाटी तालुक्यातील बनपुरी गाव येथे पुलाची पाहणी केली. गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे शेतकऱ्यांना पाण्यातूनच वाट काढावी लागत आहे. तासगाव तालुक्यातील मजार्डे गावात ही नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.pravin-darekar-at-sangali-1

 

 

 

विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी आटपाटी तालुक्यातील बनपुरी गावालाही भेट दिली, पुलाची पाहणी केली, गावांना जोडणारा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे पाण्यातूनच वाट काढून जावे लागते आहे. तासगाव तालुक्यातल्या मजार्डे गावाचीही स्थिती अत्यंत बिकट असल्याचे चित्र आहे.pravin-darekar-at-sangali

 

 

मिरज तालुक्यातील बिसुर गावातील पुराची पाहणी केली. यावेळी सोबत माजी राज्यमंत्री सदा भाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार धनंजय गाडगीळ, जिल्हा अध्यक्ष मा आमदार पृथ्वीराज देशमुख हे सोबत होते.pravin-darekar-at-sangali-4

 

 

 

 

pravin-darekar-at-sangali-3

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here