जळगाव (संपादक सुनिल पाटील) – कोरोना व्हायरसमुळे गंभीर झालेल्या रुग्णांना जिथे इतर कोणीही हात लावण्यास तयार नव्हते त्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून ॲम्बुलन्स चालक या कोरोना रुग्णांना हॉस्पिटल्सपर्यंत पोहचवत होते. कोरोना विरोधातील लढाईत कोरोना योध्दा म्हणून या मोठ्या दुव्याचे आभार मानण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दल व जनमत प्रतिष्ठान जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सलाम तुमच्या कार्याला’ या उपक्रमातंर्गत ॲम्बुलन्स चालकांचा सन्मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.
विश्व हिंदू परिषद बजरंग दल व जनमत प्रतिष्ठान जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सिविल हॉस्पिटल ॲम्बुलन्स ड्रायव्हर जे स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना पेशंटना ने-आण करत सेवा कार्यरत बजावत आहेत अश्या लोकांना सलाम यांच्या कार्याला म्हणत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आज त्यांना सन्मान पत्र व जेवण देण्यात आले त्याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री दीपक भाऊ दाभाडे, जनमत अध्यक्ष पंकज नाले,सिव्हिल हॉस्पिटलचे पप्पू भाऊजगताप उपस्थित होते.
Home Uncategorized सलाम तुमच्या कार्याला या उपक्रमातंर्गत जळगावात कोरोना योध्दा ॲम्बुलन्स चालकांचा सन्मानपत्र देऊन...







