हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम यांनी घेतली भेट!

kultabad

अल्पसंख्याक शिष्यवृत्ती मध्ये येणाऱ्या अडचणी बाबत पुन्हा अल्पसंख्यांक मंत्री ना.नवाब मलिक साहेब यांना निवेदन सादर!

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – अल्पसंख्याक समाजाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी अल्पसंख्याक शिष्यवृत्ती व यात येणाऱ्या समस्या (अडचणी) त्वरित सोडण्यात याव्या म्हणून जवळपास 2 महिन्यापासून पाठपुरावा सुरू आहे आणि आज पुन्हा अल्पसंख्याक मंत्री ना. नवाब मलिक साहेब यांची औरंगाबाद येथे एका नामांकित हॉटेल मध्ये हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दूल रहीम यांनी भेट घेतली व पुन्हा स्मरण म्हणून पुन्हा निवेदन सादर केले व सविस्तर चर्चा केली.

 

 

 

वेळोवेळी पाठपुरावा करून ही काही निर्णय घेण्यात आले नाही व येणाऱ्या अडचणी बाबत निरांकरण करण्यात आले नाही म्हणून आज पुन्हा औरंगाबाद येथे निवेदन सादर करण्यात आले व समस्यां त्वरित सोडून सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली. अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फार्म भरत असतांना येणाऱ्या अडचणी खालील प्रमाणे आहे.

 

 

 

१) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती साठी विद्यार्थ्यांना पालकांचा उत्पन्नाचा दाखला (कमीत कमी तहसीलदाराचा) अनिवार्य करण्यात आला आहे ही अट रद्द करण्यात यावी. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लोक परेशान व हवालदिल झाले आहे. अनेक पालकां कडे तहसीलदार/ जिल्हाधिकारी चा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सुद्धा पैसे उपलब्ध नसतात ज्यांनी उत्पन्नाचा दाखला काढला तरी त्यांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती मिळेल याची खात्री नसते म्हणून तहसीलदाराचा/ जिल्हाधिकारी उत्पन्नाचा दाखला ची अट कमी करण्यात यावी जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यास मार्ग मोकळा होईल.
२) औरंगाबाद जिल्हा परिषद च्या उर्दू शाळांना नवीन व वेगळा यु डायस कोड मिळाला आहे म्हणून या वर्षी मागचे जे विद्यार्थी अल्पसंख्याक शिष्यवृत्तीस पात्र झाले आहेस परंतु या वर्षी नवीन युडायस कोड मिळाल्याने सर्वांचे नवीन फार्म भरण्यात येत आहे यात जे विद्यार्थी मागील वर्षात शिष्यवृत्तीस पात्र होते किंवा अनेक वर्षापासून शिष्यवृत्ती घेत आहे या परंतु या वर्षीपासून नवीन यु डायस कोड आल्याने विद्यार्थ्यांना या नवीन वर्षी नवीन फार्म भरत आहे आणि ते या वर्षी पात्र होईल याची काय खात्री असेल म्हणून जे विद्यार्थी renewal आहे त्यांना जुन्याच यु डायस कोड ने फार्म भरण्याची मुभा देण्यात यावी किंवा पर्यायी मार्ग काढण्यात यावा जेणेकरून जे विद्यार्थी मागील वर्षी शिष्यवृत्तीस पात्र झाला आहे त्याचे नुकसान होऊ नये व त्याला यावर्षी ही शिष्यवृत्ती मिळावी. याकरिता आपल्या स्तरावर काही उपाययोजना करण्यात यावी.
३) सध्या बँके मध्ये 17 वर्षाखालील विद्यार्थ्यांचे 0 बॅलन्स खाते उघडणे बंद तोंडी बंद करण्यात आलेज्या मुळे असंख्य विद्यार्थांचे खाते उघडण्यास अडचण निर्माण होत आहे.शिष्यवृत्ती आवेदन करण्यासाठी खाता क्रमांक आवश्यक असल्यामुळे शाळेतील 6 ते 17 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी 0 बॅलन्स खाते उघडण्यासाठी बँकांना स्पष्ट आदेश निर्गमित करण्यात यावे.
४)अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती फार्म भरण्याची अंतीम मुद्दत 31 ऑक्टोबर आहे ते वाढवून 31 नोव्हेंबर 2020 करण्यात यावी. जेणेकरून अल्पसंख्यांक विद्यार्थी शिष्यवृत्ती पासूम वंचीत राहू नये.
५) कोरोना च्या पार्श्वभूमीवर सर्व अल्पसंख्याक समाजाच्या सरसकट १०० % विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मिळावी.
अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती बाबत येणाऱ्या अडचणी त्वरित सोडण्यात याव्या व आम्ही दिलेले वेळोवेळी निवेदनाचा विचार करून अल्पसंख्यांक विद्यार्थी हितासाठी काही ठोस निर्णय घ्यावे अशी विनंती हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष तथा मेयार अससोसिएशन चे मराठवाडा कार्याध्यक्ष शेख अब्दुल रहीम सर, हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन चे कार्याध्यक्ष शफीक पठाण सर आदींची उपस्थिती होती..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here