जळगाव (संपादक सुनिल पाटील) – धुळे जिल्ह्यातील नवनियुक्त ॲडीशनल पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव तसेच डीवायएसपी प्रदिप मैराळे यांचा दक्ष पोलिस टाइम्सतर्फे सत्कार करण्यात आला.
एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून प्रतिमा असणारे व धुळे येथे नव्याने नियुक्त झालेले ॲडीशनल पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव तसेच डीवायएसपी प्रदिप मैराळे यांना दक्ष पोलीस टाइम्सचे संस्थापक तथा खलाणे येथील माजी सरपंच विजय टाटीया यांनी दक्ष पोलीस टाइम्सचा अंक, शाल व श्रीफळ देवून स्वागत व सत्कार करण्यात आला.
यावेळी दक्ष पोलीस टाइम्सचे संस्थापक विजय टाटिया यांच्यासह नाशिक पोलिस टाईम्सचे संपादक तुषार बाफणा व कार्यकारी संपादक राकेश पाटील हे ही उपस्थित होते.







