भाजपामधील खडसे समर्थक माळी समाजातील कुशल संघटन असलेल्या मोठया नेत्याचा राजीनामा

eknath-khadse-and-anil-mahajan

मुंबई (संपादक सुनिल पाटील) – महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष व ओबीसी जनक्रांती परिषदेचे संस्थापक अध्यक्ष ओबीसी-बहुजन नेते अनिल महाजन यांनी भारतीय जनता पार्टी या पक्षातून ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारणी सदस्य व प्राथमिक सदस्यांचा राजीनामा दिला आहे.

 

 

मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत आहे. तरी पक्ष नेतृत्वाने त्वरित राजीनामा स्वीकारावा ही नम्र विनंती असे राजीनाम्यात लिहिले आहे. महाजन हे माजी महसूल मंत्री ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जाणारे आहेत.

 

 

अनिल महाजन यांनी माळी समाजाचे ओबीसी समाजाचे एक कुशल संघटन राज्यात उभे केले आहे.राज्यभर एक वेगळी ओळख महाजन यांनी निर्माण केली आहे.ओबीसीचे अनेक कार्यकर्ते लवकरच भाजपा पक्षाला सोडचिठ्ठी देतील अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here