बोदवड (प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी) – इयत्ता नववी ते बारावी च्या विद्यार्थ्यांना साठी राज्य शासनातर्फे येत्या सोमवार पासून दि. 26 दूरदर्शन च्या सह्याद्री वाहिनीवर ज्ञानगंगा या शैक्षणिक कार्यक्रमाचे प्रसारण केले जाणार आहे पाहिल्या सत्राच्या शेवटच्या आठवड्यात शैक्षणिक कार्यक्रम सुरू होत आहे असल्याने विद्यार्थ्याची प्रतिमा संपणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा कनिष्ठ महाविद्यालय बंद असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येत नव्हते. परिणामी शिक्षणासाठी आँनलाइन शिक्षणाचा पर्याय स्विकारावा लागत आहे त्यांमुळे राज्यातील शालेय शिक्षण विभागामार्फत आणी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे सोमवार पासून दररोज सकाळी 7.30 सात ते दुपारी 12.30 वाजे पर्यंत ज्ञानगंगा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे गिरवता येणार आहे. शिक्षक 15 जून पासून विद्यार्थांना आँनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करत असुन कोरोनाच्या प्रादुर्भाव कमी झाल्याने ठिकाणी शिक्षक प्रत्यक्ष गावात जाऊन विद्यार्थांना शिकवत आहे आँनलाइन शिक्षणाला मर्यादा येत असल्यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी एमकेसीएल आणि राज्य परिषदेच्या सहकार्याने इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांसाठी” टिलीमिली” हा कार्यक्रम सुरू करण्यात आला.
नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कोणताही शैक्षणिक कार्यक्रम नव्हता परिणामी आपल्यासाठी अभ्यासक्रम कधी सुरू होणार याकडे पालक व विद्यार्थी लागले होते त्यामुळे आता शैक्षणिक कार्यक्रमांची प्रतीक्षा संपणार आहे ज्ञानगंगा कार्यक्रम सुरू करण्याबाबत माहिती राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड़ यानी सांगितले.







