खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद येथील महेश उबाळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ग्रंथालय विभागीय उस्मानाबाद येथील प्रभारी जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांना नुकताच नियुक्तीपत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील यांच्या हस्ते प्रदेश कार्यालयात देण्यात आले.
खुलताबाद येथे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते मुक्तानंद विद्या मंदिर शाळेमध्ये महेश उबाळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप विखे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश सावजी यांची उपस्थिती होती.
यावेळी तालुकाध्यक्ष अनिल चव्हाण शहराध्यक्ष मुजीबउद्दीन जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मतकर तालुका कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर दुधारे ज्येष्ठ नेते खंडू तात्या खंडागळे माजी तालुकाध्यक्ष भगवान कामठे बबन नलावडे ,अशोक उबाळे, अल्पसंख्याकांचे तालुका अध्यक्ष जावेद शेख,शहर कार्याध्यक्ष शहर उपाध्यक्ष पोपट बारगळ,सचिव इसाक कुरेशी,दीपक बारगळ,निसार पठाण, युवकांचे तालुका कार्याध्यक्ष अरुण तांबारे, शाळेचे मुख्याध्यापक सुभाष बारगळ,शिक्षक डीबी पाटील सर, एसबी पाटील,शशिकांत दौंड सर तसेच पक्षाचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.







