अद्रकीचे उत्पादन उत्तम मात्र भाव खालावल्याने मजुरीही निघेना

adrak

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – तालुक्यातील सरई, भडजी, सुलतानपुर, बाजारसावंगी व परिसरात अद्रकचे पाऊस उघडल्यावर अतिशय भारी पिक आले परंतु अद्रकीचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना मजुरीही निघत नसल्याचे चित्र आहे. adrak

 

 

खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी व परिसरात अद्रकीचे पिक आतिशय भारी आले आहे. अतिवृष्टी  मुसळधार व  संततधार पावसामुळे मध्यंतरी अद्रकीचे पिके सडत होती. परंतु पावसाने थोडी उघडीप दिल्याने अद्रक पिक सुधारले तर मेहनत खत देखरेख केल्यावर अद्रकीचे प्लाॅट पाहण्यासारखे आहे. adrak

 

 

बाजारात अद्रक पिकाला क्वींटल २५००ते३००० रुपये चे भाव व चांगला कोरडा माल असल्यास ३६०० रुपये क्विंटलची पडीव भाव मिळत आहे. यापुर्वी अद्रक प्रति क्विंटल ७००० रुपये पर्यंतचा भाव शेतकऱ्यांना मिळाला त्यामुळे शेतकरी खुश होता. परंतु वाढीव अद्रक लागवड, अद्रकीचे अधिकच उत्पन्न, नवीन कवळा माल यामुळे बाजारात भाव मिळेना तर अद्रक काढणी भाव ३००रुपये, लागवड, मेहनत, खत – औषधी खर्च त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती काही पडेना. वाढीव आवक, नवीन कवळा माल यामुळे बाजारात अद्रकीचे भाव वाढत नसल्याने अनेकांनी अद्रक काढणे बंद केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here