धनगर समाजाचे विविध मागण्यांसाठी अर्ध जलसमाधी आंदोलन 

dhangar-jalsamdhi-andolan

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी येथे धनगर समाजाने विविध मागण्यांसाठी अर्ध जलसमाधी अंदोलन पुकारले होते. यात मोठ्या संख्येने धनगर समाजाचे नागरिक जमा होऊन मागणी चे पोस्टर हातात घेवून बोडखा – पाडळी नदीवर अर्ध जलसमाधी घेतली व  वरिष्ठांकडे निवेदन करून मागणी केली.

 

 

पोलीस निरीक्षक सिताराम मेहत्रे यांनी जोरदार पोलीस बंदोबस्त ठेवला, मा तहसीलदार यांना निवेदनद्वारे मागणी करण्यात आली. गेल्या अनेक वर्षापासून धनगर समाजाच्या विविध रास्त मागण्या प्रलंबित आहे. यात प्रगती तथा मागण्या पुर्ण करण्यात येत नसल्याने बाजारसावंगी सह सर्कल मधील धनगर समाज एकत्रीत येवून सावंगीत बोडखा – पाडळी नदीवर अर्ध जलसमाधी अंदोलन पुकारले होते. यात मोठ्या संख्येने धनगर समाज जमा झाला व हातात विविध मागण्यांसाठीचे पोस्टर घेवून अर्ध जल समाधी घेतली. व तेथेच तहसीलदार उदय मानवतकर, गवळी व पोलीस निरीक्षक सिताराम मेहत्रे यांच्या कडे निवेदन सादर केले. dhangar-nivedan

 

 

यावेळी शिवाजी काटकर, डॉ भावराव काटकर पोपट काटकर कारभारी काटकर जगन्नाथ काटकर संपत पाल्हाळ वसंत बनसोड नामदेव काटकर सागर काटकर भुषण काटकर सह मोठ्या संख्येने धनगर समाजाचे नागरिक हजर होते. अर्ध जलसमाधी अंदोलन बघता पोलीस निरीक्षक सिताराम मेहत्रे यांनी जबरदस्त बंदोबस्त ठेवला होता.  पोलीस व्हॅन भरून पोलीस आणण्यात आले होते. यावेळी पोनि. म्हेत्रे, पोनि उदावंत, पोनि भगवान झरेकर, पोलीस जमादार संजय जगताप विनोद बिघोत योगेश नाडे नवनाथ कोल्हे ठोकळ संतोष पुंड पोपा. कारभारी नरवडे मगांतंमुअ. प्रकाश नलावडे आदि उपस्थित होते. अंदोलन शांततेत पार पडले. dhangar-andolan

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here