एकनाथ खडसेंनी मला व्हिलन ठरवलं पण त्याबद्दल आत्ताच बोलणार नाही- देवेंद्र फडणवीस

aurangabad-press

केंद्राची वाट न बघता शेतकऱ्यांना तात्काळ मदत करुन दिलासा द्या.

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – नाथाभाऊंचा मी आदर करतो त्यांनी मला व्हिलन ठरवल यावर नंतर प्रतिक्रिया देईल अजून योग्य वेळ नाही. एकनाथ खडसे यांच्या जाण्याने पक्षाला नुकसान होईल पण भाजपा मोठा पक्ष आहे जळगाव जिल्ह्यात अगोदर पासून भाजपा मजबूत आहे. त्यामुळे फरक पडणार नाही. असे वक्तव्य औरंगाबाद शहरात आयोजित पत्रकार परिषदेत प्रश्नाचे उत्तर देताना विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

 

 

जेष्ठ नेते एकनाथ खडसेंनी बुधवारी भाजपाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे शुक्रवारी ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहे. फडणवीस यांच्यामुळे भाजपा सोडत असल्याचा आरोप एकनाथ खडसेंनी लावल्यानंतर प्रश्न विचारला असता फडणवीस यांनी हे उत्तर दिले. पुढे बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारकडे मागणी केली अतिवृष्टीमुळे पिकांची भयावह परिस्थिती आहे. शेतकरी संकटात आहे अश्रू पूसण्याची हिच वेळ आहे.

 

राज्य शासनाने केंद्राकडून मिळणारे जीएसटीच्या पैशाचे राजकारण न करता तात्काळ मदतीची घोषणा करावी. केंद्राची मदत हवी असेल तर निवेदन तयार करुन पाठवा. मोदी सरकार अवश्य मदत करेल. युपीए सरकारपेक्षा इतिहास बघितले तर मोदी सरकारने संकटकाळी जास्त मदत महाराष्ट्राला केली आहे. फडणवीस यांनी केंद्राकडून मिळालेल्या निधीची आकडेवारी पत्रकार परिषदेत वाचून दाखवली. राज्य सरकार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व अश्रू पूसण्यासाठी पूढे येत नाही. जवाबदारी झटकत आहे. तिजोरीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पैसे नसतील तर कर्ज कढावे आणि तात्काळ मदत करा अशी मागणी फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, माजीमंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खा. डॉ. भागवत कराड, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, प्रवक्ता शिरीष बोराळकर, जिल्हाध्यक्ष विजय औताडे, शहराध्यक्ष संजय केनेकर उपस्थित होते.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here