ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – पोलीस बॉईज असोशियन संस्थापक रवी वैद्य यांच्या पुढाकाराने पोलिसांच्या मुलांना 5 टक्के आरक्षण मिळवून दिले आहे सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक गरजू गरीब लोकांना असोसिएशन मार्फत मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे या कोरोना महामारी मध्ये अनेक पोलीस अधिकारी ,पोलीस कर्मचारी ,डॉक्टर ,नर्स सफाई कर्मचारी व स्वयंसेवक ,समाजसेवक यांना कोरोना योद्धाने सन्मानित केलेले आहे
त्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यातील सुरेन ठाकुर देसाई अत्यंत गरिबीतून सीए झालेले आहेत गरीबी काय असते हे त्यांनी सुद्धा अनुभवलेले आहे आणि आजपर्यंत ते गरीब गरजूंना वृद्धाश्रमांना मदत करत आहे आणि कोरोना महामारी मध्ये सुद्धा त्यांनी अनेक गरीब लोकांना मदत केली आहे
त्यांच्या कार्याची दखल म्हणून पोलीस बॉईज असोसिएशनचे प्रदेश कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सिद्धार्थ डी जाधव यांच्या आदेशानुसार ठाणे जिल्हा अध्यक्ष सतीश बनसोडे यांच्या सूचनेनुसार दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया चे सीए सुरेन ठाकुर देसाई ठाणे शाखा अध्यक्ष, सीए शिव भगवान आसावा उपाध्यक्ष ठाणे शाखा, संजय गोदवलेकर उपाध्यक्ष भाजपा अनु जाती मोर्चा ठाणे व परेश जेठवा कामगार आय सी ए आय ठाणे शाखा यांना कोरोना योद्धा गौरवने सन्मानित करण्यात आले कोरोना योद्धा गौरवने सन्मानीत करण्यात आल्यामुळे संपूर्ण टीमने पोलीस बॉईज असोशियनचे आभार व्यक्त केले







