प्रवास एका पुस्तक प्रकाशनाच्या सुवर्ण क्षणांचा

mumbai-pustak-prakashan

मुंबई (प्रतिनिधी प्राजक्ता अरुण चव्हाण) – शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची ज्ञानकुंभ टीम या पुस्तकाचे गट शिक्षणाधिकारी हिराजी वेखंडे यांच्या हस्ते नॉलेज अकॅडमीचे सल्लागार रमेश वनारसे, आदिवासी उन्नती मंडळाचे समन्वयक रामचंद्र कशिवले गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावणाऱ्या जाणीव प्रतिष्ठानचे अध्यक्ष अरुण पाटील यांच्या शुभहस्ते सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून हे प्रकाशन पार पडले. यावेळी वनारसे व पाटील यांनी या पुस्तक निर्मितीच्या कामातील राबलेल्या हातांचे, व या स्तुत्य उपक्रमातील बहुमोल निर्मितीला भरीव अर्थसाह्य करून पुस्तक रुपात रूपांतर करणाऱ्या आदिवासी उन्नती मंडळाचे व समन्वयक कशिवले यांचे कौतुक केले.

 

गेली अनेक वर्ष शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची ज्ञानकुंभ टीम गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ओळखल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी वैशिष्ट्येपूर्ण काम करत आहे. यात विद्यार्थी, शिक्षक यांना मार्गदर्शनाबरोबरच या टीमने विद्यार्थ्यांना ही परीक्षा अधिक सोपी होण्यासाठी ज्ञानकुंभ क्लृप्त्या व सूत्रे, ज्ञानकुंभ सराव प्रश्नपत्रिका संच या पुस्तकांची निर्मिती केलेली आहे. परंतु शिष्यवृत्ती मार्गदर्शनाच्या या प्रवासात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या सखोल अभ्यासासाठी वैविध्यपूर्ण प्रश्नांची बँक असावी असा विचार सतत या टीमच्या मनात घोळत होता आणि कोरोना काळाच्या जनता कर्फ्युमध्ये या विचाराने जोर धरला. सोशल मीडियावर गुणी आणि उपक्रमशील शिक्षकांचा ग्रुप तयार झाला. या विधायक उपक्रमात स्वतः हून ३२ प्राथमिक शिक्षक आणि शिक्षिका सहभागी झाले. विनामोबदला आपल्या अनुभवांचा सुयोग्य वापर करत शिक्षकांनी एकेका घटकावर १०० पेक्षा जास्त प्रश्न तयार करत ५ हजार पेक्षा जास्त प्रश्न असलेली एक समृद्ध प्रश्नपेढी तयार केली.

 

सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानकुंभ टीमचे सुधाकर पाटील यांनी केले. चंद्रकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर रवींद्र भोईर यांनी पुस्तक निर्मितीसाठी राबलेल्या सर्व गुणिजनांबद्दल ऋणनिर्देश व्यक्त केले. शेवटी डॉ. हरिश्चंद्र भोईर यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here