पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांची घेतली पदाधिकारी व क्रीडा शिक्षकांनी भेट
धरणगांव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – धरणगाव तालुका छत्रपती क्रीडा संकुल कामाला लोकवर्गणीतून सुरुवात करण्यात आली असून पालकमंत्री मा.ना.गुलाबरावजी पाटील साहेब यांची तालुका क्रीडा शिक्षक व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व क्रीडा संकुल संदर्भात चर्चा केली.
संपूर्ण महाराष्ट्रातील क्रीडा संकुले ही अपूर्ण अवस्थेत असून निधी अभावी क्रीडा संकुले अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे त्यांच्या लाभ तालुक्यातील खेळाडूंना ज्येष्ठ नागरिकांना घेता येत नाही त्यांची मला खंत आहे जळगाव जिल्ह्यातील सर्व क्रीडा संकुला साठी 25 कोटीचा प्रस्ताव पाठवला असून मार्च नंतर निधी उपलब्ध होऊ शकेल लोकवर्गणीतून जेवढे सहकार्य लागेल तेवढे सहकार्य करण्याचे आश्वासन ना. गुलाबरावजी पाटील यांनी दिले पुढील आठवड्यात या संदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.
सकाळी 11 वाजता क्रीडा संकुल परिसरात जेसीबी मशीन द्वारे क्रीडा संकुला समोरील व ट्रैक वरील स्वच्छता कामाला सुरुवात करण्यात आली असून अमळनेर तालुका क्रीडा संकुला साठी आमदार पाटील सो यांनी लोकवर्गणीतून खेळाडूंसाठी क्रीडा संकुल सुरू केले असून त्याच धर्तीवर धरणगाव तालुका क्रिडा संकुलचे सुद्धा काम सुरू करण्यात आले असून मागील काळात 4 ते 5 पायी फिरणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा, युवकांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे क्रीडा संकुल सुरू झाल्यास ज्येष्ठ नागरिक सुद्धा त्याच्या उपयोग घेऊ शकतील लवकरात लवकर खेळाडूंसाठी क्रीडा संकुल वापरण्या योग्य केले जाईल अशी माहिती मा.नगराध्यक्ष पी एम पाटील सर यांनी दिली.
या प्रसंगी क्रीडांगणाची पाहणी करताना पी एम पाटील सर,नगराध्यक्ष निलेश चौधरी,श्री व्यायाम प्रसारक मंडळाचे अध्यक्ष भानुदासजी विसावे, विजय महाजन,लोकशाही चे संपादक भरत चौधरी,न.पा.गटनेते कैलास माळी सर,तालुका क्रीडा शिक्षक अध्यक्ष सचिन सूर्यवंशी सर, जितेंद्र ओस्तवाल,हेमंत माळी,आर बी महाले,संदेश महानुभाव,विकास शिरसाठ,के एस पाटील,एन वाय पाटील,गावित सर,डी एन पाटील आदी उपस्थित होते.







