नवरात्रोत्सवात बलात्काराचे वाढते प्रमाण संस्कृतीला काळीमा फासणारे – पंकज नाले

janmat-pratisthan

जळगांव (प्रतिनिधी गौरव पांडे) – नवरात्रोत्सवात बलात्काराचे वाढते प्रमाण संस्कृतीला काळीमा फासणारे असे प्रतिपादन जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांनी केले . जळगाव येथील निवृत्ती नगर प्रभाग क्रमांक ९ मध्ये त्यांचे स्वर्गीय पिताश्री . किसन नाले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवरात्र पर्वात अष्टमीनिमित्ताने दिनांक २४ ऑक्टोबर २०२० रोजी मनपाच्या कर्तव्यदक्ष सफाई कामगार यांचा साडी व ब्लाउज वाटप कार्यक्रम झाला त्याप्रसंगी मार्गदर्शन करतांना नाले बोलत होते .

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपाच्या नगरसेविका सौ . नीता ताई सोनवणे असून प्रमुख अतिथी मुक्ताई महिला भजनी मंडळ अध्यक्ष अंबाबाई गुजर , सामाजिक कार्यकर्ते विजय लुल्हे उपस्थित होते . साडी वाटप सौ . नीता सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले . विजय लुल्हे यांनी आजी सौ .शेवंता नथू मिस्तरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सॅनीटायझर व मास्क स्वहस्ते वितरीत केले . सत्कारार्थी महिला शोभा बाविस्कर, ज्योती अहिरे, मंगला मोरे, वैशाली अहिरे, आशा आकाडे ,अनिता अहिरे, स्वप्ना गाजरे, सुनंदा अहिरे, पौर्णिमा बिऱ्हाडे उपस्थित होत्या .

 

विजय लुल्हे मार्गदर्शनात म्हणाले की, ” कायद्याचा प्रतिबंध कडक न झाल्यास राक्षसी बलात्कारी पृथ्वीवर काही वर्षातच फक्त नरमादी संस्कृती प्रस्थापित करतील .” अध्यक्षीय भाषणात नगरसेविका सौ .अनिता ताई सोनवणे यांनी रावेर, भुसावळ, धरणगाव चाळीसगाव येथील महिलांवर नातेवाईकांकडूनच होणाऱ्या विकृत बलात्कारांमुळे नात्यांचे पावित्य दिवसोंदिवस नष्ट होत आहे . ” कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनमत प्रतिष्ठान सचिव हर्षाली पाटील यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेक सोनवणे ,अनंत नेवे, सर्पतज्ञ विवेक देसाई ,प्रशांत सुर्वे यांनी अनमोल सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here