जळगाव (संपादक सुनिल पाटील) – माता भगिनींचा सत्कार प्रासंगिक मात्र संरक्षणाचे सदैव उत्तरदायित्व आपल्या सर्व पुरुषवर्गाचे ” असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते विजय लुल्हे यांनी केले .जळगाव येथील निवृत्ती नगर प्रभाग क्रमांक ९ मध्ये साडी वाटप व सॅनेटराईझ वाटप कार्यक्रम जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांचे स्वर्गीय पिताश्री . किसन नाले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नवरात्री पर्वात अष्टमीनिमिताने दि . २४ ऑक्टोबर २०२० रोजी संपन्न झाला . त्याप्रसंगी विजय लुल्हे मार्गदर्शन करतांना बोलत होते .
कार्यक्रमाच्या अध्यक्षा नगर सेविका सौ . नीताताई सोनवणे यांच्या हस्ते म .न .पा. च्या कर्तव्यदक्ष नऊ सफाई कामगार महिलांचा साडी व ब्लाऊज पीस देऊन सत्कार करण्यात आला . कार्यक्रमास प्रमुख अतिथी मुक्ताई महिला भजनी मंडळाच्या अध्यक्षा अंबाबाई पाटील ,जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले उपस्थित होते . विजय लुल्हे यांनी आजी स्वर्गीय शेवंता नथू मिस्तरी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महिलांना सॅनीटायझर व मास्क स्वहस्ते सन्मानपूर्पक वितरीत केले .
सत्कारार्थी महिला शोभा बाविस्कर , ज्योती अहिरे , मंगला मोरे , वैशाली अहिरे ,आशा आकाडे ,अनिता अहिरे ,स्वप्ना गाजरे , सुनंदा अहिरे पूर्णिमा बिऱ्हाडे उपस्थित होत्या .पंकज नाले आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की ,” नवरात्री उत्सवातही बलात्काराचे वाढते प्रमाण संस्कृतीला काळीमा फासणारे आहे .
अध्यक्षीय भाषणात नगरसेविका सौ . निताताई सोनवणे यांनी रावेर , भुसावळ , धरणगाव , चाळीसगाव येथील महिलांवर बलात्कार करणाऱ्या विकृतांचा खरमरीत शब्दात निषेध केला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जनमत प्रतिष्ठान सचिव हर्षाली पाटील यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विवेक सोनवणे , अनंत नेवे ,सर्पतज्ञ विवेक देसाई ,प्रशांत सुर्वे यांनी सहकार्य केले.







