दर सोमवारी शिंदखेडा येथे शिवसेनेचा जनता दरबार; जागेवर समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न – शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके

shindkheda-janta-darbar

धुळे (प्रतिनिधी) – शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदार संघातील शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरीक यांना त्यांचे दैनंदिन येणाऱ्या शासकीय पातळीवरील अडचणी लक्षात घेऊन व शिवसेना धुळे जिल्हा ग्रामीणचे जिल्हाप्रमुख श्री.हेमंत साळुंके यांचेकडे येणाऱ्या सर्वसामान्य नागरीकांची तक्रारीची दखल घेऊन शिवसेना धुळे जिल्हा ग्रामीण मधील शिंदखेडा व शिरपूर मतदार संघातील नागरीकांच्या समस्यां जागेवर सोडविण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. हेमंत साळुंके यांनी दर सोमवारी सकाळी दहा वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौफुली शिंदखेडा येथे जनता दरबाराचे आयोजन करण्याचे ठरविले आहे.

 

शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी महसुल, आरोग्य, कृषी, पंचायत समिती, जिल्हापातळी वरील ज्या ज्या विभागाच्या तक्रारी असतील त्या-त्या विभागाच्या तक्रारींच्या सोडवणुकीसाठी जागेवर प्रयत्न केले जातील. अनेकदा नागरीक किरकोळ कामासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडे वारंवार चकरा मारुनही कामे होत नाहीत. अशा वेळी नागरीकांचा पैसा व वेळ वाया जातो. शिवाय त्यांच्या कामाची दखलही घेतली जात नाही. अशा नागरीकांसाठी यापुढे शिवसेनेच्या माध्यमातून त्यांची कामे तातडीने मार्गी लागावी यासाठी प्रयत्न केले जातील. यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री. उध्दवसाहेब ठाकरे यांचे आदेशानुसार उत्तर महाराष्ट्राचे संपर्क नेते तथा शिवसेना नेते खासदार श्री. संजय राऊत, संपर्क प्रमुख श्री. बबनराव थोरात यांचे मार्गदर्शन घेतले जाईल.

 

धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.श्री. अब्दुल सत्तार साहेब यांचे सहकार्याने व मार्गदर्शनाने तातडीने कामे व्हावीत यासाठी प्रयत्न केले जातील. शिंदखेडा व शिरपूर विधानसभा मतदार संघातील नागरीकांनी त्यांचे तक्रारी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शिंदखेडा येथे प्रत्येक सोमवारी सकाळी दहा ते सहा या वेळेत आणाव्यात, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. हेमंत साळुंके यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here