दस-याचा मुहर्त साधत अखिल चर्मकार समाजसेवा फाऊंडेशन (कार्यक्षेत्र संपुर्ण भारत) ची संस्थापना

charmkar-seva-santha

पुणे (उपसंपादक मनीष नेरुरकर) – आज दि. 25/10/2020 दस-याचा मुहर्त साधत अखिल चर्मकार समाजसेवा फाऊंडेशन (कार्यक्षेत्र संपुर्ण भारत) चे उद्‌घाटन झाले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. भिमरावअण्णा देसाई (सांगली) यांनी भुषविले. अखिल चर्मकार समाजसेवा फाऊंडेशन (कार्यक्षेत्र संपुर्ण भारत) मधे समाजाच्या समस्या, प्रश्न तसेच समाजहिताची कामे केली जातील आणि चर्माकार समाजातील तळागाळातील समाजबांधवांना प्रवाहात आण्यासाठी एकमुखाने सर्व समाजबांधवांनी घटनास्थळी शपथ घेतली. आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हा विचार मनात रूजवून, समाजाप्रती आपले कर्तव्य निभावण्यासाठी अखिल चर्मकार समाजसेवा फाऊंडेशन (कार्यक्षेत्र संपुर्ण भारत) सदैव तत्पर राहील असे यावेळी आण्णांनी सांगीतले.

 

समाज बांधवांसाठीचे रोजगार, शिक्षण, महिला सबलीकरण, समाजातील बांधवांवर होणारे हल्ले तसेच अनैतीक छळ यावर फाऊंडेशनचे पदाधीकारी याचे जास्त प्रमाणात लक्ष असून आपला जिव ओतून समाजहीताची कामं केली जाणार आहेत. आपल्या समाजाचे दैवत संत रविदास महाराज यांनी घालून दिलेला आदर्श त्यांच्या कार्यकाळात त्यांनी केलेले समाजकार्य, महाराजांनी लिहीलेले समाजहीताचे दोहे डोळ्यासमोर ठेऊन समाज बांधवांनी आपल्या समाजबांधवांना मदत करून प्रभोधन करावयाचे आहे. असे फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. दिनेशजी जाधव यांनी सांगीतले.
संत रविदास म्हणायचे “मन चंगा तो कठौतीमे गंगा” याप्रमाने सर्व समाजबांधवांनी संय्यम बाळगून महाराजांनी दिलेला समाज हिताचा संदेश केंद्रस्थानी ठेऊन वागणे गरजेचे आहे. हे या कार्यक्रमात फाऊंडेश चे प्रदेश अध्यक्ष मा. श्री. गजाननजी शिंदे यांनी यावेळी सांगीतले. मुंबई, सांगली, पुणे तसेच वेगवेगळ्या विभागातील पदाधीकारी या कार्यक्रमासाठी यावेळी आवर्जुन ऊपस्थीत होते.

या कार्यक्रमात प्रदेश अध्यक्ष मा. श्री. गजाननजी शिंदे तसेच महिला प्रदेश अध्यक्ष श्रीमती सुरेखा सुर्वे यांच्या नावाची घोषणा करून त्यांना प्रदेश पदाची जबाबदारी यावेळी सर्वानुमते देण्यात आली. व फाऊंडेशनच्या त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन (कात्रज मांगडेवाडी) राजेशाही हाॅटेल याठिकाणी श्रीमती सुनिता कसबे यांनी केले तर नियोजन राजेशाही हाॅटेलचे मालक मा. श्री. महेशजी मांगडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व समाजबांधवांचे शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्तावीक फाऊंडेशच्या प्रवक्ता श्रीमती सुनिता कसबे यांनी केले तसेच सुत्रसंचालन फाऊंडेशनचे महासचीव मा. श्री. दत्तात्रयजी पांडुरंग कदम यांनी केले तर या कार्यक्रमाला आलेल्या पदाधीका-यांचे आभार फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्य सचिव मा. श्री. सुजयजी जाधव यांनी मानले.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here