भारतीय सौर ४ कार्तिक शके १९४२, निज आश्विन शुक्ल दशमी सकाळी ८.५९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: शततारका उत्तररात्री ६.३५ पर्यंत, चंद्रराशी: कुंभ, सूर्यनक्षत्र: स्वाती, सूर्योदय: सकाळी ६.३८, सूर्यास्त: सायं. ६.०७, चंद्रोदय: दुपारी ३.१५, चंद्रास्त: पहाटे २.१४.
आजचे शुभ मुहूर्त :
अभिजित मुहूर्त : सकाळी ११ वाजून ४२ मिनिटे ते १२ वाजून २७ मिनिटे.
विजय मुहूर्त : दुपारी ०१ वाजून ५७ मिनिटे ते ०२ वाजून ४२ मिनिटे.
निशिथ काळ : रात्रौ ११ वाजून ४० मिनिटे ते १२ वाजून ३१ मिनिटे.
अमृत काल : रात्री १० वाजून ४५ मिनिटे ते १२ वाजून ३० मिनिटे.
गोधुलि मुहूर्त : सायंकाळी ०५ वाजून २९ मिनिटे ते ०५ वाजून ५३ मिनिटे.
रवि योग : संपूर्ण दिवस.
आजचे अशुभ मुहूर्त
राहु काळ : सकाळी ०७ वाजून ३० मिनिटे ते ०९ वाजेपर्यंत.
यमगंड : सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते ०३ वाजेपर्यंत.
गुलिक काळ : दुपारी ०१ वाजून ३० मिनिटे ते ०३ वाजेपर्यंत.
दुर्मुहूर्त काळ : रात्री १२ वाजून २७ मिनिटे ते ०१ वाजून १२ मिनिटे.
दिनविशेष: श्री मध्वाचार्य जयंती.
आजचे राशिभविष्य
मेष : आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ देऊ नका. पूर्ण खात्री केल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नका. हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. जोडीदाराचे सानिध्य आणि सहयोग दोन्ही प्राप्त होऊ शकेल. मुलांकडून शुभवार्ता मिळतील. दिवसाच्या उत्तरार्धात प्रलंबित कामे मार्गी लागतील. प्रियजनांच्या भेटीचे योग.
वृषभ : अचानक धनलाभ होईल. गुंतवणुकीसाठी योग्य काळ. आजचा दिवस शुभ आणि शांततेत व्यतीत होऊ शकेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना लाभदायक कालावधी. पद, प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. दिवसाच्या उत्तरार्धात काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. मुलांकडून दिलासा मिळू शकेल.
मिथुन : नातेवाईकांमध्ये टोकाची भूमिका घेऊ नका. नोकरी व्यवसायात आपले कर्तृत्व दिसून येईल. दिवसभरात काही ना काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. एखादी मौल्यवान वस्तू गमावण्याची शक्यता. मुलांना मिळालेल्या यशामुळे मन प्रसन्न राहील. दिवसाच्या उत्तरार्धात एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकेल.
कर्क : व्यवसायात गोष्टी काळजीपूर्वक करा. जोडीदाराबरोबर आपले विचार स्पष्ट मांडा. आजचा दिवस शुभ असेल. संपत्तीत वृद्धी होण्याची शक्यता. मान, सन्मान, प्रतिष्ठा वाढीस लागेल. मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडू शकाल. देशाटन, पर्यटनाचे योग आहेत. प्रवास लाभदायक ठरतील. प्रिय व्यक्तींच्या भेटीने मन प्रसन्न होईल. शुभवार्ता मिळू शकतील.
सिंह : नोकरीत कामाचा व्याप वाढेल. आपले सामाजिक काम व्यवस्थित हाताळा. दिवसभरात काही ना काही लाभ मिळू शकतील. मिळकतीचे स्रोत वाढू शकतील. संवाद कौशल्यामुळे मान, सन्मान प्राप्त होऊ शकतील. शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम दिवस. स्पर्धेत अपेक्षित यश मिळू शकेल. दिवासाच्या उत्तरार्धात धावपळ संभवते. नेत्रविकार होऊ शकतात. विरोधक पराभूत होतील.
कन्या : जोडीदाराशी सामंजस्याने वागा. मुलांकडून अपेक्षा पूर्ण होतील. आजचा दिवस शुभ आणि सुखात वाढ करणारा ठरू शकेल. मुलांकडून सुखदवार्ता मिळू शकतील. चांगल्या कामासाठी पैसे खर्च होतील. समाधान मिळेल. कीर्ती, प्रसिद्धी वृद्धिंगत होऊ शकेल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल.
तुळ : हातून धार्मिक वाचन, लिखाण होईल. अति तिखट पदार्थांचे सेवन टाळा. आजचा दिवस सुखद असेल. कौटुंबिक वातावरण सुखद आणि सकारात्मक असेल. आनंदाची अनुभूती घ्याल. अनेक दिवसांपासून अडकलेला व्यवहार मार्गी लागू शकेल. मित्रांच्या भेटीने प्रसन्न राहील. विरोधक पराभूत होतील. छोटे प्रवास संभवतात.
वृश्चिक : गुंतवणूक योग्य पद्धतीने करा. अपेक्षित उत्तराने लाभ होईल. आरोग्याच्या तक्रारी संभवतात. वेळीच वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरेल. पथ्यपाणी, औषधे चुकवू नयेत. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आराम करणे हितकारक ठरेल.
धनु : घरातील व्यक्तींचे बोलणे जास्त मनाला लावून घेऊ नका. खेळात प्राविण्य मिळवाल. विरोधकांकडून कौतुक, प्रशंसा होईल. सासरच्या मंडळींकडून काही ना काही लाभ मिळू शकेल. दिवसाच्या उत्तरार्धात मित्रांच्या भेटीने किंवा संवादामुळे मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. एकूणच आजचा दिवस विशेष ठरू शकेल.
मकर : जोडीदाराच्या मताचा आदर करा. समाजात मान, सन्मान मिळेल. आर्थिक स्थिती ठीक राहील. हाती घेतलेल्या कामातील प्रयत्न सकारात्मक ठरू शकतील. कार्यालयातील सहकार्यांकडून उत्तम सहकार्य व मान मिळेल. आपले मत विचारात घेतले जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात कोणत्याही वादात पडू नये. पालकांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
कुंभ : भाग्य आपल्या बाजूने चालत येईल. नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. दिवस काहीसा कष्टकारक असू शकेल. काही ना काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल. नकारात्मकता, निराशा टाळून केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरू शकेल. वादाचे प्रसंग कटाक्षाने टाळावेत.
मीन : महत्वाच्या बाबतीत उतावीळपणा टाळा. समाजामध्ये प्रतिष्ठा लाभेल. मध्यम फलदायी दिवस. मुलांच्या चिंतेत दिवस व्यतीत होऊ शकेल. वैवाहिक जीवनातील मतभेद दूर होऊ शकतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. प्रवास करताना सावधगिरी बाळगणे हिताचे राहील. एखादी मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता. सावध राहावे.







