नाथाभाऊ ‘राष्ट्रवादी’ झाल्यानंतर मुक्ताईनगर भाजपा कार्यालयाला लागले कुलूप

muktainagar-bjp-office

बोदवड (प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी) – मुक्ताईनगर (जळगाव) अगदी सकाळ पासून कार्यकर्त्यांची वर्दळ असलेले भाजप कार्यालय अगदी सुनेसूने पाहण्यास मिळत आहे एकनाथराव खडसेंच्या राष्ट्रवादी कांग्रेस मधील पक्षातरानंतर भाजपला उतरतीची कळा लागल्याचा प्रत्यय जाणवू लागला आहे. मुक्ताईनगर येथील भाजप कार्यालयाला लागलेल्या कुलुपावरुन हे दिसुन येते आहे.

 

मतदारसंघात गेल्या कित्येक दिवसांपासून भाजपावर नाराज असलेले माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पक्षांतराबाबत चर्चा होती. तसेच नाथाभाऊंनी राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये प्रवेश केल्याने मुक्ताईनगर मधील भाजपाचे काय होईल याबाबत चर्चा रंगत असतांना मुक्ताईनगर शहरात भाजपचे अस्तित्व कमी झाल्याचे मोठे उदाहरण पाहण्यास मिळत आहे दररोज सकाळपासून वर्दळ असलेल्या मुक्ताईनगर शहरातील भाजप कार्यालयाला लागलेले कुलुप सर्व बोलून जाते.

 

कार्यालयात कोणी आलेच नाही
मुक्ताईनगर मतदारसंघात खडसें यांना वैयक्तिक मानणारा वर्ग मोठय़ा प्रमाणात असल्याने एकनाथराव खडसेंवर भाजपने केलेल्या अन्याच्या विरोधात नाथाभाऊंबरोबर भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीसुद्धा भाजपला सोडचिठ्ठी दिली त्यामुळे मुक्ताईनगर शहरात भाजप कार्यालय उघडण्यासाठीसुद्धा भाजपचा कार्यकर्ता उरला नसल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here