शहादा तालुक्यातील असंख्य कार्यकर्तासह दंगल सोनवणे यांचा भाजपामध्ये प्रवेश

shahada-bjp

शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – रविवार दि 25 आँक्टोबर विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर कम्युनिस्टचे शहादा तालुक्यातील नेते दंगल सोनवणे व त्यांच्या असंख्य कार्यकर्तान सह दमदार आमदार राजेशजी पाडवी यांच्या विकासाचा दुरदुष्टी वर विश्वास ठेवत जिल्हा अध्यक्ष विजय भाऊ चौधरी व परीसराचे नेते बापूसाहेब दिपकजी पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मधे प्रवेश केला.

 

या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष विजय चौधरी म्हणाले की देशात कोरोना सारख्या भयानक महामारीच्या काळात देशाचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांनी देशातील गोरगरीब जनतेच्या हितासाठी ज्या सोयी सुविधा व योजना राबवील्या आजवर कोणत्याही सरकारला शक्य झाले नसते म्हणून आमदार राजेश पाडवी यांनी या संकट समयी मतदार संघात केलेल्या कामाची पावती म्हणजे आज या असंख्य कार्यकर्ताचा प्रवेश केला आहे.

 

पुढे बोलताना श्री चौधरी म्हणाले की, आमदार पाडवी यांना काल आमदार म्हणून निवडून एक वर्ष पुर्ण झाले. एका वर्षात केला विकास कामांची तुलना मागील आमदाराच्या विकास कामाच्या तुलनेने खुप मोठ्या प्रमाणात विकासाची विकासाची गंगा आणली आहे. आमदार राजेश पाडवी म्हणाले की, मी मागील एका वर्षात मतदार संघातील लहान – लहान पाड्यांपर्यत पोहचन्याचा प्रयत्न केला आहे. त्यातनं अनेक पाड्यांवर कोणालाही लोकप्रतिनिधीने भेट दिली नाही आशा ठिकाणी पोहचुन मी नागरीकाचा समस्या जाणुन घेतल्या त्या वर तातडीने कारवाई करीत समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीत आहे पुढे बोलताना आमदार राजेश पाडवी साहेब म्हणाले की आगामी काळात होणारे स्थलांतरन थांबविण्यासाठी मतदारसंघत उद्योग समुह उभे करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत या वेळी पदाधिकारीनी प्रवेश केला. dangal sonawane

 

यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष विजय भाऊ चौधरी, आमदार राजेशजी पाडवी, सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील, दंगल सोनवणे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनिल चव्हाण, किसान मोर्चा प्रदेश सदस्य डॉ किशोर पाटील,अदिवासी मोर्चा जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांतजी वसावे,तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, योगेश पाटील, प.स. सदस्य डॉ विजय चौधरी, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष हर्षल पाटील, बळीराम दादा पाडवी, अदिवासी मोर्चा जिल्हा सचिव नारायण ठाकरे,संरपच अविनाश मुसळदे, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सचिन देवरे, भाजपा शहर अध्यक्ष विनोद जैन,जितेंद्र जमदाडे, उपाध्यक्ष पंकज सोनार,महामंत्री हितेंद्र वर्मा, वैभव सोनार,रमाशंकर माळी, युवा अध्यक्ष शरद पाटील,अक्षय अमृतकर, दिलवर राजपुत, प्रशांत कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष शानुताई वळवी, शहर अध्यक्ष सिमा सोनगरे, गोपाल गांगुर्डे,सत्तार ठाकरे, अजय फुलपगारे,किरण सोनवणे, अदिवासी मोर्चा शहर अध्यक्ष झुलाल भाऊ अहिरे,सुरज ठाकरे, शंकर ठाकरे, दिनेश मराठे, दिपक ठाकरे, दिल्या कोळी, दुर्गेश मराठे,शरद कोळी, महेश महाजन, जितेंद्र शिकलीकर, राजीव देसाई, नजमोदिन खाटीक,विरसिंग पाडवी, विठ्ठलराव बागले, गुड्डू वळवी व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here