जळगांव (संपादक सुनिल पाटील) – सद्यपरिस्थितीत महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे. महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देऊन राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी सिद्ध करणारी हिंदू जनजागृती समितीप्रणित महिला शाखा रणरागिणीचा आज वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
महिला आपल्या जीवनामध्ये अनेक संघर्षांना तोंड देत आलो आहे. काळानुरूप परिस्थिती पालटत असून महिलांचे जीवन दिवसेंदिवस असुरक्षित होत आहे. आपल्याला वाटत असेल की, पोलीस महिलांचे संरक्षण करतील, मग मी कशाला चिंता करू ? परंतु आता महिलांनीच विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. निर्भया प्रकरण असो किंवा कोपर्डी घटना असो, आता आपले रक्षण आपल्यालाच करायचे आहे, हे निश्चित. यासाठीच येणार्या कठीण काळात हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखा महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणार असून स्वसंरक्षणासह राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी युवतींना, माता-भगिनींना सिद्ध करणार आहे. रणरागिणी शाखेच्या या उपक्रमात अधिकाधिक युवतींनी सहभागी व्हावे.
राष्ट्र आणि धर्म यांना तसेच महिलांना अत्याचारांपासून मुक्त करण्यासाठी रणरागिणीमध्ये सामील होण्याचे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.








