नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि. कुबेर जाधव) – या भागातील समाजकार्यासाठी प्रसिध्द असणारे तसेच मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे संचालक, महाराष्ट्र शासनाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रशांत देवरे यांचा नाशिक पोलिस आयुक्तालय येथील कोविड केअर सेंटर साठी दिलेल्या योगदानाबद्दल व नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारली याबद्दल पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डॉ.प्रशांत देवरे यांनी सेवाभावी वृत्तीने पोलिस दलातील कर्मचाऱ्यांना योग्यवेळी उपचार उपलब्ध होण्यासाठी कोरोनाबाधित रुग्णांसाठी अल्पावधीत अत्यंत मेहनतीने १०० खाटांच्या रुग्णालयाची उभारणी केली. नोडल अधिकारी म्हणून त्यांनी आपले कर्तव्य यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल, त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात याबद्दल पालकमंत्री ना. छगन भुजबळ यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देण्यात आले.
याप्रसंगी विभागीय आयुक्त श्री. गमे, नाशिक महानरपालिका आयुक्त श्री. जाधव, जिल्हाधिकारी श्री. मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे, पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, नाशिकचे पोलिस आयुक्त दीपक पांडे, नाशिक ग्रामीणचे पोलीप्रमुख श्री. घुगे, तसेच पोलिस दलातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.








