धरणगाव (जिल्हा प्रतिनिधी योगेश पी पाटील) – लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेशभाऊ चौधरी व नायब तहसीलदार धरणगाव प्रथमेश मोहोळ यांना कोरोणा योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थापक अध्यक्ष शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी एम पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी शिवेसना जिल्हा प्रमुख गुलाबरावजी वाघ,मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मीक पाटील सर,मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव,संस्थेचे पदाधिकारी वसंत पाटील,एकनाथ पाटील,गट साधन केंद्र पंचायत समिती धरणगाव येथील जयदीप पाटील,दीपक पाटील,तालुका क्रीडा शिक्षक अध्यक्ष सचिन सूर्यवंशी,पत्रकार धर्मराज मोरे,आर डी महाजन,योगेश पी पाटील,सूत्रसंचालन संतोष भडांगे सरांनी केले व आभार योगेश पी पाटील सरांनी मानले.
आर एच पाटील नंदकुमार पाटील,किशोर पाटील,चंद्रराव पाटील,अनंत जाधव,दिलीप पाटील,उमेश पाटील,सरलाबाई बोरसे, कल्पना ठाकरे व आरिफ शाह शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते .







