जळगाव जिल्ह्यात आढळले 67 कोरोनाबाधित

corona

जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात सोमवारी पुन्हा नव्याने 67 रुग्ण आढळुन आले आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 52 हजार 862 इतकी झाली आहे. तर सोमवारी दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 

सोमवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये जळगाव शहरातील 41, जळगाव ग्रामीणमधील 00 , भुसावळ येथील 03, अमळनेरातील 02 , चोपडा येथील 09, पाचोरा येथील 00, भडगावातील 01, धरणगाव 00, यावल येथील 00, एरंडोल येथील 00, जामनेरातील 01, रावेर येथील 04, पारोळा येथील 00, चाळीसगावमधील 01, मुक्ताईनगरातील 05, बोदवड येथील 00, परजिल्ह्यातील 00 रुग्णांचा समावेश आहे.

 

जिल्ह्यात आतापर्यंत 50 हजार 408 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यातील 156 रुग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. सध्या 1186 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यात सोमवारी चार रुग्णांचा मृत्यू झाला. यात दोन मृत्यू डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय, एक मृत्यू अमळनेर येथे तर एक मृत्यू मानस हॉस्पिटल जळगाव येथे झाला आहे.
मृत्यू झालेल्यांमध्ये जळगाव शहरातील 70 वर्षीय पुरुष, अमळनेर तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष, रावेर तालुक्यातील 64 वर्षीय पुरुष व भुसावळ तालुक्यातील 70 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here