विधानपरिषद ‘राज्यपाल नामनिर्देशित’ आमदारांच्या नियुक्त्यांना उद्या मुहूर्त ?

ठाणे (प्रतिनिधी सतीश बनसोडे) – विधानपरिषदेत राज्यपालांना एकूण १२ लोकं आमदार म्हणून नामनिर्देशित करण्याचा अधिकार असतो.राज्य विधान परिषदेच्या १२ नामनिर्देशित आमदारांच्या नियुक्त्या ह्या जून महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियुक्त्या लांबल्या होत्या.याला उद्या मुहूर्त मिळण्याची खात्रीलायक बातमी बुलंद पोलीस टाइम्सला समजली आहे.

 

सरकारमधील तीनही घटक पक्षांकडून एकूण १२ आमदारांची यादी तयार असल्याची माहिती आहे. एकनाथ खडसेंसह आदेश बांदेकर, आशिष देशमुख, वरुण सरदेसाई, सत्यजीत तांबे, सचिन सावंत, सचिन अहिर या नावांसह जवळपास १७ नावांची चर्चा आहे.

 

शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांकडून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी तयार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर उद्या ही यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यकडे सुपूर्द केली जाणार असल्याची माहिती आहे. देशात एकूण ७ राज्यात विधान परिषद अस्तित्वात आहे.सेनेतर्फे सुनील शिंदे,आदेश बांदेकर,सचिन अहिर,शिवाजीराव आढळराव-पाटील, वरुण सरदेसाई यांच्यासोबत राहुल कनाल हे युवा सेना पदाधिकाऱ्याचे नाव देखील चर्चेत आहे.तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे एकनाथ खडसे,शिवाजी गर्जे,आदिती,सूरज चव्हाण,राजू शेट्टी,आनंद शिंदे तर कॉंग्रेसतर्फे सचिन सावंत, आशिष देशमुख,नसीम खान, मोहन जोशी, सत्यजीत तांबे ही नावं चर्चेत आहेत.

 

कला, वाङ्मय, विज्ञान, सहकारी चळवळ आणि सामाजिक कार्य अशा क्षेत्रातील तज्ज्ञ किंवा प्रत्यक्ष कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींची राज्यपाल विधान परिषदेवर नियुक्ती करु शकतात. तज्ज्ञांच्या अनुभवाचा राज्याला फायदा व्हावा, यासाठी विधान परिषदेसारख्या वरिष्ठ सभागृहात दिग्गजांची नियुक्ती करण्याची घटनेत तरतूद आहे.पण बऱ्याच वेळेस राजकीय पुनर्वसनासाठी या नियुक्त्यांचा वापर केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here