चोपडा उपजिल्हा रूग्णालयास १५ व्हेंटीलेटर प्राप्त आमदार लताताई सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश

चोपडा (नंदलाल मराठे) – तालुक्यात कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता चोपडा उपजिल्हा रूग्णालयात उपचार घेणाऱ्या कोविड संशयीत रूग्णांना चांगल्या दर्जाची सेवा मिळावी म्हणुन चोपडा उपजिल्हा रूग्णालयासाठी पुरेशा प्रमाणात व्हेंटीलेटर पुरवावे अशी मागणी आमदार लताताई सोनवणे यांनी वेळोवेळी शासना कडे केली होती.

त्या नुसार चोपडा उपजिल्हा रूग्णालयात कोविड रूग्णांसाठी महाराष्ट्र शासनाने १५ व्हेंटीलेटर आज चोपडा उपजिल्हा रूग्णालयास प्राप्त झाले १५ व्हेंटीलेटरचे आमदार लताताई सोनवणे मा.आ.प्रा.चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते चोपडा उपजिल्हा रूग्णालयाकडे सुपुर्द करण्यात आले व्हेंटीलेटर प्राप्त झाल्याने आता चोपडा येथे कोविडच्या गंभीर रूग्णांना आता चांगल्या प्रकारे आरोग्यसेवा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांन मध्ये आनंदाचे वातावरण होते
या प्रसंगी राजेंद्र पाटील तालुका प्रमुख हरिष पाटील जि प सदस्य एम.व्ही.पाटील मा.उपसभापती अॅडो. एस.डी.सोनवणे तहसिलदार अनिल गावित उपजिल्हा रूग्णालय अधिक्षक डाॅ. मनोज पाटील तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ प्रदिप लासुरकर गट विकास अधिकार बी.एस.कोसोदे भरत बाविस्कर पंचायत समिती सदस्य विकास पाटील विधानसभा क्षेत्र प्रमुख सुकलाल कोळी तालुका संघटक दिपक चौधरी युवासेना उपजिल्हा प्रमुख गोपाल चौधरी युवासेना तालुका प्रमुख सुनिल पाटील आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here