भक्तनिवास ते ईदगाह रस्ता रुंदीकरण तसेच विद्युतीकरणची केली मागणी
खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – खुलताबाद येथील जगप्रसिद्ध धार्मिक,ऐतिहासिक पर्यटन स्थळात जाण्यासाठी येथील महामार्गाचे काम चालू असुन भद्रा मारुती भक्तनिवास ते ईदगाह पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण व विद्युतीकरण करणे बाबतचे निवेदन सोमवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना नगराध्यक्ष अॅड.एस.एम क़मर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,खुलताबाद येथील महामार्गाचे काम सध्यास्तिथी चालू असुन खुलताबाद येथील प्रसिद्ध भद्रा मारुती मंदिर ते ईदगाह (वेरूळ टी पॉइंट) दरम्यान केवळ अर्धा किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण व विद्युतीकरण अत्यंत आवश्यक आहे.नगरपरिषदच्या वतीने निवेदन देऊन ही अद्याप ही येथे कोणतेही प्रकारचे रुंदीकरण करण्यात आले नाही.तसेच सदर रस्त्यात असलेली डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील चौफुलीचे रुंदीकरण पूर्णपणे करण्यात आले नाही.
खुलताबाद येथे प्रसिद्ध मंदिर,सूफ़ी संतांची दर्गा तसेच मुग़लसम्राट औरंगज़ेबची समाधी व इतर पर्यटन स्थळ आहे.वर्षातून लाखो पर्यटक तसेच भाविक येथे येत असतात.म्हणून भद्रा मारुती मंदिर भक्तनिवास ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते ईदगाह (वेरूळ टी पॉइंट) पर्यंत अर्धा किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण तसेच विद्युतीकरण करण्यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावे.या निवेदनावर नगराध्यक्ष अॅड.एस.एम क़मर ,माजी नगराध्यक्ष अॅड. क़ैसरोद्दीन ,नगरसेवक शेख अब्दुल हाफिज़ (जुबेर लाला),नगरसेवक मुनीबोद्दीन,नाजेरा बेगम मेहमूद कुरैशी,हिना बेगम शेख इमरान ,माजी नगरसेवक शर्फोद्दीन मो.रमज़ानी,समाजिक कार्यकर्ते मिर्झा अब्बास बेग यांची सह्या आहेत.







