नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – तुर्भे येथील गणेशनगर येथील फायझर रोड समोरील मुख्य रस्त्यावर पावसामुळे मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून आजतागायत कोणत्याही प्रकारची दुरुस्ती झाली नसून या मुख्य रस्त्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून दोनचाकी वाहनावरून (बाईक) वर जाणाऱ्या वाहनांचे रात्रीच्या वेळेस खड्ड्यात चाक अडकून अनेक वेळेस अपघात झाले आहे.
या खड्ड्यांमुळे अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तुर्भे येथील गणेश नगर फायर रोड येथील मुख्य रस्त्याची चाळण झालेली असून यावर अनेक वेळेस लेखी तक्रार देऊन देखील कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. यापुढे जर लवकरात लवकर सदर रस्ता दुरुस्त न केल्यास शिवसेना विभाग प्रमुख महेश कोठीवाले यांच्यातर्फे यांच्याकडून सदरील मुख्य रस्त्यावर शिवेनेच्या स्टाईलने आंदोलन छेडले जाईल व सदर गंभीर समस्येची दखल लवकरात लवकर न घेतल्यास इथून पुढे होणाऱ्या गंभीर अपघातास संपूर्णपणे नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन जवाबदार असेल.







