
जळगाव (संपादक सुनिल पाटील) – शहरातील अल्पसंख्याक समाजातील डॉक्टरांनी जे अहो रात्र कार्य केले त्याच्या कार्याला कोविड युनिट ने जो सन्मान दिला त्यास मनपा पूर्ण पणे समर्थन करिते असे प्रतिपादन महापौर भारती सोनवणे यांनी केले.
मनपा सभागृहात डॉक्टरांचे गौरव समारंभात त्या बोलत होत्या व्यासपिठावर आयुक्त सतीश कुलकर्णी, मुफ्ती अतिकुर रहेमान,हाजी गफ्फार मलिक,डॉ शब्बीर शाह, फारूक शेख व डॉ जावेद शेख उपस्थित होते.
शहरात ११ वैद्यकीय शिबीर व ग्रामीण भागात २ शिबीर घेण्यासाठी ज्या अल्प संख्याक समाजातील जलगाव शहरातील डॉक्टरांनी मेहनत घेऊन सहकार्य केले त्या खऱ्या कोरोना योध्दा चा गौरव समारंभ मनपा सभागृहात करण्यात आला या वेळी एकूण ५१ डॉक्टरांचे गौरव करण्यात आले त्यात चार जोडपींचा समावेश होता.
खरे योध्दा सोबतच मानव सेवेचे प्रणेते आहे हे डॉक्टर- कुलकर्णी
डॉक्टरांचे गौरव करून त्यांना सन्मानित करतांना स्वतःला सुद्धा बरे वाटत आहे की माझ्या शहरातील हे डॉक्टर योध्दा तर आहेच परंतु मानव सेवा करणारे ते खरे प्रणेते आहेत असे उदगार आयुक्त मनपा यांनी काढले
गफ्फार मलिक व मुफ्ती अतिक यांचे सुद्धा समयोचित भाषणे झाली. फारूक शेख यांनी प्रास्ताविक सादर करताना दहा दिवसाचा आढावा सांख्यिकी स्वरूपात मांडला. डॉक्टर अलीम बागवान व डॉ नसीम शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करून लोकांनी आजाराला न घाबरता आमच्या कॅम्प च्या माध्यमाने पुढे यावे असे आव्हान केले.
मुश्ताक मिर्झा, महेमुद खान,आरिफ देशमुख,मझर पठाण, अकील पटेल, सलीम इनामदार, एडवोकेट अमीर शेख, जमिल देशपांडे, अजिज शिकलगर, अन्वर शिकलगर, अनिस शाह तय्यब शेख ,ताहेर शेख, युसुफ शाह, फारूक काद्री, आयाज अली, इसाक बागवान , सय्यद मुजाहिद मनियार मोहसिन, व तलहा तय्यब यांची उपस्थिती होती
सत्कारमूर्ती ५१ डॉक्टर
शरीफ शहा, सईदशेख, मीनाज पटेल, अजिजुल्लला शेख ,नसीम अन्सारी ,असीम खान, रियाज शेख ,फिरोज शेख ,सौ नसीम शेख, इक्बाल शेख, वसी अहमद अमजद खान, सौ झिनत-उन-निसा खान ,अब्दुल वहाब,सौ निशाद वहाब, इम्रान खाटीक, कुमारी आफ्रीन शेख, वकार शेख ,सौ जहारा वकार, वसीम कुरेशी ,मोहसिन कुरेशी, वसीम शाह,एजाज शाह, नदीम नजर ,अलीम बागवान ,शोएब पटेल, मतीन शेख ,अल्ताफ खान, मोईस देशपांडे, तौसिफ शेख, कुमारी सायमा खान, सौ निखत शेख, फारुख सलीम, जफर शेख, सौ गजाला शफिक ,रइस कासार, कामिल शेख ,रियाज बागवान, साबीर मंसूरी, सौ शमिना कबीर, रिजवान खाटीक, इरफान खान, कुमारी महेजबिन सय्यद ,इम्रान खान.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन झाकीर खान व जावेद शेख तर आभार अल्ताफ शेख यांनी आभार मानले.







