कोरोना योध्दे डॉक्टरांचा जळगाव कोविड केअरतर्फे सत्कार

जळगांव (संपादक सुनिल पाटील) – शहर हा कोविड19 चा हॉटस्पॉट असतांना सुद्धा या ठिकाणी जे डॉक्टर आपले जीव धोक्यात घालून रुग्णाची सेवा फक्त आपले कर्तव्य म्हणून न निभवता माणुसकी म्हणून निभावीत आहे व मानव सेवा हीच ईश्वर सेवा म्हणून कार्य करीत आहे अशा या खऱ्या योध्दा डॉक्टराना जळगाव कोविड केअर चे मुख्य समनव्यक डॉ जावेद शेख,जनसंपर्क प्रमुख फारूक शेख,संचालक अनिस शाह व अझीझ सिकलगर यांनी त्यांच्या कडे जाऊन त्यांचे आभार मानून त्यांना प्रमाण पत्र व पुष्प देऊन त्यांचा गौरव केला.
यात प्रामुख्याने आमचे शहराचे सर्वात सिनिअर डॉ जे बी राजपूत, शासकीय महाविद्यालयाचे डॉ मारुती पोटे,डॉ विजय गायकवाड व डॉ मिलिंद चौधरी,मनपा चे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ राम रावलानी तसेच सामान्य रुग्णालयाच्या माजी वैद्यकीय अधिकारी श्रीमती डॉ प्रभा बडगुजर व मारियम क्लीनिक चे डॉ फारूक शेख व डॉ सौ सायका फारूक शेख यांचा समावेश होता.
डॉ राम रावलानी यांचा सत्कार उप आयुक्त मिनीनाथ दंडवते यांच्या हस्ते करण्यात आला त्या वेळी त्यांच्या सहकारी डॉ मनीषा उगले,डॉ पल्लवी पाटील,डॉ सोनल कुलकर्णी,डॉ पल्लवी नारखेडे, डॉ सायली पवार या सुद्धा उपस्थित होत्या.
हे सर्व डॉक्टर आपला धर्म फक्त डॉक्टर हाच आहे याला अनुसरून कार्य करीत असल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here