बीड (राहुल दुबाले) – कोरोना मध्ये शहीद झालेल्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या परिवाराला म्हाडा मध्ये घर द्यावे किंवा जिथे महानगरपालिका नाही तिथे 5 एकर गायरान जमीन किंवा शासनाच्या मालकीची जागा द्यावी व महाराष्ट्रातील तमाम पोलीस अधिकारी कर्मचारी यांना म्हाडा मध्ये सवलती देऊन घर द्यावे ही खरी खरी मदत खाकी साठी होईल, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलिस निराकरण समन्वय समिती सदस्य राहुल अर्जुनराव दुबाले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, खा.शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस, ना.जितेंद्र आव्हाड, ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, जगात कोरोनाने हा हा कार घातलाय व कोरोनाची लागण होऊन देशातील व राज्यातील कित्येक पोलीस अधिकारी व कर्मचारी हे शहिद झाले आहेत आमचे परिवार रस्त्यावर आले आहेत आम्ही खूप तणावाच्या व भीती च्या वातावरणात जगत आहोत आणि कित्तेक खाकितील कोरोना योद्धे उपचार घेत आहेत आमच्या पोलीस अधिकारी कर्मचारी यांचे व परिवाराच्या मनात एकच भीती धडका देत असते ती म्हणजे सुखरूप राहिलोत तर घर कुठे आहे जन्म होतो पोलीस लाईन मध्ये आणि कधी कधी मृत्यू पण होतो पोलीस लाईन मधेच आम्हाला हक्काचे स्वप्नातले घर कधी घेताच येत नाही
देशाची राज्याची जिल्ह्याची गावाची जीमेदारी आमची असते पण घराची परिवाराची जीमेदारी आम्हाला घेता येत नाही. कारण सद्राक्षणाय खलनिग्रहनाय ची शपथ घेतली असते देश सेवा समाज सेवीची जबाबदारी घेतली असते आणि आम्ही करतो पण आणि करणार ही कधी कुठली गोष्ट मागितली नाही पण आता घर रस्त्यावर येत आहे म्हणून परिवारांसाठी विंनती करतोय मुंबई,पुणे,नागपूर,औरंगाबाद,अश्या अनेक जिल्ह्यात हक्काचे घर घ्यायचे म्हणजे ऐपत नाही तमाम महाराष्ट्रातील पोलीस परिवारातील लोकांकडून विंनती करतो कोरोना मध्ये शहीद झालेल्या परिवाराला हक्काचे घर द्यावे किंवा 5 एक्कर जमीन द्यावी किंवा गायरान जमीन बक्षीस म्हणून द्यावी व महाराष्ट्रातील तमाम पोलीस अधिकारी कर्मचारी यांना म्हाडा सारख्या योजनांमध्ये सवलती देऊन घरे द्यावी
जसे सीमेवर जवान शहीद झाल्यावर त्यांच्या परिवाराला शासन मदत करते त्याच धर्तीवर जागतिक महामारी मध्ये शहीद झालेल्या पोलीस परिवाराला जागा बक्षीस म्हणून किंवा हक्काचे घर द्यावे व महाराष्ट्रातील तमाम पोलीस अधिकारी कर्मचारी यांना म्हाडाच्या स्कीम मध्ये सवलती देऊन घर द्यावे व ज्या जिल्ह्यात महानगरपालीका नाही अश्या ठिकाणी शहीद योजना ,पोलीस योजना किंवा असे काही तरी नावाने योजना चालू करून त्यांना घरे द्यावी ही मी कळकळीची विंनती करतो माझ्या या विंनतीचा भावणीकतेच्या नजरेने विचार करून सहनभूतीपर निर्णय घेऊन या गोष्टीला मान्यता द्यावी, अशी विनंतीही या निवेदनात शेवटी राहुल दुबाले यांनी केली आहे.







