नाशिक (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टी सिडको मंडळ 2 च्या वतीने आज संपूर्ण मंडलामध्ये वाढीव वीज बिल संदर्भात आंदोलन करण्यात आले .संपूर्ण मंडलामध्ये 20 ते 22 मोठे चौक व नगरसेवकांच्या कार्यालयाबाहेर जनतेच्या सहभागाने वीज वितरण कंपनी व महाराष्ट्र शासनाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा व वीज बिलाची होळी करून आंदोलन करण्यात आले.
‘या सरकारचा करायचं काय खाली डोकं वर पाय’, ‘उद्धव सरकार हाय हाय’, ‘वीज बिल माफ करा माफ करा.’ अशा घोषणांनी निषेध करण्यात आला व महावितरणचे उपविभागीय अधिकारी प्रदीप पाटील तसेच अंबड एमआयडीसी मधील अभियंत्यांना निवेदन देऊन बिल माफ करण्यासंदर्भात मागणी करण्यात आली.
यावेळेस नाशिक पश्चिम चे आमदार सौ सीमाताई महेश हिरे मंडल अध्यक्ष अविनाश पाटील, नगरसेविका प्रतिभा पवार,अलकाताई अहिरे, कावेरी घुगे, निलेश ठाकरे, प्रदीप पेशकर, उखाणा चौधरी, बाळासाहेब पाटील, राकेश ढोमसे, प्रसाद ठाकरे, जितेंद्र रणाळकर, निवृत्ती इंगोले, राजेंद्र फळ, अमोल शेळके, अजय ठाकूर, अखलाक सिद्दिकी ,अशोक पवार, धनाजी लगड ,डॉ. वैभव महाले , अमोल पाटील ,दिनेश मोडक ,रामदास पाटील, संजय कदम, डॉक्टर प्रवीण चौधरी, सोमनाथ शिंदे, चिराग सोनी, स्वाती ठाकरे, विनय मोगल ,आबा पवार ,हेमंत नेहते ,गांगुर्डे मामा, पुनम चौधरी ,शिवम शिंपी, बंडु जाधव ,प्रशांत मेणे ,सचिन पाटील ,तन्मय गांगुर्डे ,योगेश मोरे ,डॉ सनान्से आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते







