जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव – औरंगाबाद मार्गावर नेरीनजिक असलेल्या भवानी फाटा येथे शासकीय कामासाठी अवैध वाळूचा
उपयोग केला जात असल्याची तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ते दीपककुमार गुप्ता यांनी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या तक्रारीवर निर्णय घेत जिल्हाधिकाऱ्यांनी अपर जिल्हाधिकारी यांना आदेश दिल्याने, त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास या साठ्याच्या मोजणीचे आदेश अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. त्यानुसार काल (दि.३) सकाळी ११ वाजता मोजणी करण्यात आली.
वाळू मोजणी झाल्यानंतर १ हजार ५ ब्रास वाळूसाठा असल्याचे आढळून आले. ही तपासणी गौण खनिज अधिकारी दिपक चव्हाण, जामनेर तहसीलदार अरुण शेवाडे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे जामनेर येथील अधिकारी, महसूलचे तलाठी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. यावेळी तक्रारदार दीपककुमार गुप्ता हे ही उपस्थित होते. या वाळूसाठ्यासंदर्भात कारवाई करण्यात येणार असून, संबंधित ठेकेदाराला नोटीस पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहे.







