पनवेल (सचिन पाटील( बाक्कर)) – गुन्हे शाखा, कक्ष ४, अॅन्टॉपहिल, मुंबईच्या पथकाने चिता कॅम्प, ट्रॉम्बे, मुंबई परीसरात बुधवारी (दि.१ जुलै) केलेल्या कारवाईत पोलीस पथकाने हेरॉईन व गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एका इसमास रंगेहाथ पकडले असून त्यांच्याकडून तब्बल ६० लाख ८० हजार रूपये किंमतीचा हेरॉईन व गांजाचा साठा जप्त केला आहे.
हा इसम हेरॉईन व गांजा या अंमली पदार्थाची विक्री करीत असून तो हेरॉईन व गांजा हा अंमली पदार्थ मुंबई उपनगरात आणून गि-हाईकांना विक्री करतो व सदर अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी संशयित इसम बुधवारी चिता कॅम्प, ट्रॉम्बे, मुंबई परीसरात येणार आहे अशी खात्रीशीर खबर गुन्हे प्रकटीकरण शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग कक्ष ४, अॅन्टॉपहिल, मुंबई यांच्या पथकाला मिळाली होती.
मिळालेल्या खबरीच्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग, कक्ष ४ च्या पोलीस पथकाने मेट्रो कारशेड जवळ, एन.ए.डी नाल्याजवळ, साईबाबा नगर, चिता कॅम्प, ट्रॉम्बे, मुंबई परीसरात संध्याकाळच्या सुमारास सापळा रचला असता, साधारण १७.४५ वाजताचे सुमारास गुप्त खबरीने वर्णन केल्याप्रमाणे एक इसम हा त्या ठिकाणी आल्यानंतर पोलीस पथकाने त्याच्यावर झडप घातली. सदर इसमाची पोलीस पथकाने झडती घेतली असता त्यांच्या ताब्यामध्ये तब्बल ६० लाख ८० हजार बाजार मुल्याचे २९५ ग्रॅम हेरॉईन व २ किलो वजनाचा गांजा हे अंमली पदार्थ मिळून आले.
ताब्यात घेण्यात आलेल्या इसमाचे अली मोहमंद शफी आलम शेख, (वय ६०) असून, त्याच्याविरोधात अंमली पदार्थ विरोधी कायदया अंतर्गत ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात वि.स्था.गु.र.क ६०/२० कलम ८(क),सह २०,२१ अंमली पदार्थ विरोधी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा, गुन्हे अन्वेषण विभाग वि.स्था.गु.र.क २१/२० कलम ८(क),सह २०,२१ अंमली पदार्थ विरोधी कायदा अन्वये कक्ष ४, मुंबई यांच्याकडून करण्यात येत आहे. आरोपी सराईत अंमली पदार्थाची विक्री करणारा अभिलेखावरील गुन्हेगार असून, त्याचेवर यापूर्वी ट्रॉम्बे पोलीस ठाणे वअंमली पदार्थ विरोधी कक्ष,घाटकोपर युनिट येथे अंमली पदार्थ बाळगले व विक्री करण्याचे विविध गुन्हे दाखल आहेत.
या कारवाईत सह पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री. विनय कुमार चौबे यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उप आयुक्त (प्रकटीकरण) शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, डी-(पुर्व) अविनाश शिंगटे. प्र. पो. नि. निनाद सांवत, पो.नि.जगदिश भांबळ, स.पो.नि.विनोद माळवे, राजेश पाटिल, बिभिषण गव्हाणे, पोह कृष्णा नार्वेकर, पोह. सदानंद परब,दयानंद कांबळे पोना.ज्ञानेश्वर मिंडे,अजय बल्लाळ पो.शि.संजय गायकवाड या पथकाने सहभाग घेतला होता.







