कोरोना योध्दा सन्मानाने समाजाला पोलिसांचे महत्व पटवून दिले – उदय आठल्ये

सातारा (शरद मोरे) – सगळीकडे कोरोनाचा फैलाव होत असताना, जिल्ह्यातील पोलीस दल जिल्हा पोलीस प्रमुख श्रीमती तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो बंदोबस्त ठेवून, कोरोनाविरोधातील या युध्दात २४ तास मेहनत घेत आहेत.
पोलिसांसाठी पोलीस मित्र उद्‌य आठल्ये यांनी कोरोना योध्दा सन्मान ही संकल्पना राबविली होती. या संकल्पनेचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले. या सन्मानामुळे पोलिसातील माणूस लोकांना जाणवला. आज आपण आपल्या कुटुंबासोबत रहावे म्हणून पोलीस आपल्या पत्नीमुलांसमवेत दोन वेळचे जेवण एकत्रित करु शकत नाही. २४ तास असणाऱ्या ड्यूटीमुळे त्याला कोणताही सण साजरा करण्याची मुभा नाही. जो समाजासाठी राब राब राबतो त्याची कदर करण्याची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक सामान्य नागरिकाने पोलिसांना सहकार्य केले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here